Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता हद्दच झाली! Urfi Javedनं ओलांडल्या सर्व मर्यादा, टॉपलेस होऊन केला नाश्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 18:37 IST

Urfi Javed : उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

शूटिंगच्या निमित्ताने दुबईत झालेल्या गोंधळामुळे उर्फी जावेद (Urfi Javed) सध्या चर्चेत आहे. दरम्यान, उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून खळबळ माजवली आहे. या व्हिडीओत ती टॉपलेस दिसते आहे आणि शरीर नाश्ताने झाकलेले दिसते आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या मजेशीर कमेंट्स वाचायला मिळत आहे.

उर्फी जावेदने मंगळवारी २७ डिसेंबर रोजी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये उर्फी हॉटेलच्या रूममध्ये पोझ देताना दिसत आहे. पण उर्फीचे कोणतेही काम ट्विस्टशिवाय पूर्ण होत नाही, हे तिच्या चाहत्यांना माहीत आहे. या व्हिडीओतही त्याने असेच काहीसे केले आहे. उर्फीने कपडे न घालता स्वतःला फक्त प्लेट्स आणि ग्लासेसने झाकले आहे.

उर्फी जावेदने व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'ब्रेकफास्ट.' पण उर्फीच्या नाश्त्याने लोकांना तिचा पाय खेचण्याची संधी दिली. या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सच्या कमेंट्स मजेशीर आहेत. एका युजरने म्हटले की 'हिच्या कॅमेऱ्यामनची मजा आहे.' तर दुसऱ्याने लिहिले की, 'मी असं गेलो तर माझी आई मला चप्पलने मारेल.'