Join us

आता खरंच संपणार 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका, रॅपअप पार्टीचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 14:56 IST

Mazi Tuzi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतीच या मालिकेची रॅप अप पार्टी पार पडली आहे.

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ'(Mazi Tuzi Reshimgath)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले होते.  या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ही मालिका काही महिन्यांपूर्वी बंद झाली होती. पण प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ही मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात आली. दरम्यान आता असे समजते आहे की, ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप  घेणार आहे. या मालिकेची रॅप अप पार्टी नुकतीच पार पडली. 

माझी तुझी रेशीमगाठ मालिका निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतीच या मालिकेची रॅप अप पार्टी पार पडली आहे. या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर रॅप अप पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळली. पहिल्यांदा या मालिकेला  चांगला प्रतिसाद मिळालाच पण दुसऱ्यादा जेव्हा ही मालिका पुन्हा सुरू झाली तेव्हाही प्रेक्षकांनी या मालिकेला खूप चांगल प्रेम दिलं. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, मायरा वायकुळ यांच्या भूमिकांना विशेष पसंती मिळाली आहे.

माझी तुझी रेशीमगाठ मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत सध्या अनुष्काचे वडील तिचे लग्न जमवत आहेत. तर तिचे यशवर प्रेम असल्याची तिला जाणीव होते. यशला ही गोष्ट कळते. त्यामुळे त्याला देखील आता अनुष्का त्याला त्याची लाइफ पार्टनर म्हणून चालेल असे वाटू लागते. त्यासाठी यशदेखील तिच्याशी बोलणार आहे. दरम्यान अनुष्काला शेफाली नेहाच्या घरी घेऊन येते. तिथे आल्यानंतर अनुष्काला स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी आठवू लागतात. त्यामुळे तिला भूतकाळ आठवून तीच नेहा असल्याची जाणीव होईल का, हे जाणून घेणे कमालीचे ठरणार आहे.