Join us

​आता घोड्यांनाही द्यावे लागतेय ऑडिशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 17:41 IST

कोणत्याही कार्यक्रमात अथवा मालिकेत काम करण्यासाठी एखाद्या कलाकाराची निवड करण्याआधी ऑडिशन घेतले जाते. ऑडिशननंतरच तो कलाकार त्या भूमिकेसाठी योग्य ...

कोणत्याही कार्यक्रमात अथवा मालिकेत काम करण्यासाठी एखाद्या कलाकाराची निवड करण्याआधी ऑडिशन घेतले जाते. ऑडिशननंतरच तो कलाकार त्या भूमिकेसाठी योग्य आहे की नाही याचा निर्णय घेतला जातो. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अनेक मातब्बर कलाकारांनादेखील त्यांच्या भूमिकांसाठी ऑडिशन द्यावे लागते. तो कलाकार त्या भूमिकेसाठी योग्य आहे की नाही दे ऑडिशननंतरच ठरवले जाते.कलाकारांचे ऑडिशन घेतले जाते असे आपण अनेकवेळा ऐकले आहे. पण एखाद्या भूमिकेसाठी कोणत्या प्राण्याचे ऑडिशन घेतले गेले असल्याचे तुम्ही कधी एेकले आहे का? हो, आता प्राण्यांनाही आपल्या भूमिकेसाठी ऑडिशन द्यावे लागत आहे. आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटात अनेक प्राणी झळकले आहेत. पण त्यांनी कधी ऑडिशन दिल्याचे ऐकिवात नाही. पण नुकतेच चंद्र-नंदिनी या मालिकेतील एका दृश्यासाठी काही घोड्यांचे ऑडिशन घेण्यात आले. या ऑडिशनसाठी तब्बल 300 घोडे आले होते. या कार्यक्रमात रजत टोकस प्रमुख भूमिकेत आहे. एका दृश्यात रजतला घोडा चालवायचा होता. पण काही कारणास्तव चित्रीकरणाच्या दिवशी ठरलेला घोडा चित्रीकरणाच्या स्थळी पोहोचू शकला नाही. त्यामुळे ऐनवेळी एका घोड्याला आणून त्याच्यासोबत चित्रीकरण करायला सुरुवात केली. पण काही केल्या या दृश्याचे चित्रीकरण होत नव्हते. त्यांच्या मनाप्रमाणे हे चित्रीकरण होत नसल्याने त्यांनी शेवटी घोड्यांचे ऑडिशन घेण्याचे ठरवले आणि 300 घोड्यांच्या ऑडिशनमधून सगळ्या गोष्टीत पारंगत असलेल्या एका घोड्याची निवड करण्यात आली. रजतला खूप चांगल्याप्रकारे घोडस्वारी येते. त्यामुळे त्याच्यासाठी तर त्या घोड्यासोबत चित्रीकरण करणे हे अतिशय सोपे काम होते.