Join us

​आता भाभीजीमध्ये झळकणार हा बॉलिवुडचा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 14:19 IST

भाभीजी घर पर है या मालिकेत गोविंदाने नुकतीच हजेरी लावली. त्यानंतर आता शक्ती कपूर या मालिकेत झळकणार आहे. शक्ती ...

भाभीजी घर पर है या मालिकेत गोविंदाने नुकतीच हजेरी लावली. त्यानंतर आता शक्ती कपूर या मालिकेत झळकणार आहे. शक्ती एका भागात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण त्याने नुकतेच केले. या मालिकेचे चित्रीकरण करतानाचा त्याचा अनुभव खूपच चांगला होता. या चित्रीकरणादरम्यान त्याने या मालिकेच्या टीमसोबत मजामस्ती केली. या मालिकेत शक्ती कपूरसोबत रंजितही पाहायला मिळणार आहे. रंजितने ऐंशीच्या दशकातील अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. या मालिकेविषयी तो सांगतो, "भाभीजी घर पर है ही मालिका मला खूप आवडते. या मालिकेचे अनेक भाग मी पाहिले आहेत. ही मालिका तुम्ही संपूर्ण कुटुंबियांसोबत एकत्र पाहू शकतात. या मालिकेतील विभूती आणि तिवारी दोघांचीही भूमिका मला खूप आवडते. त्यातील विभूतीची भूमिका तर मला जास्त आवडते. छोट्या पडद्यावर अनेक चांगल्या मालिका सध्या येत आहेत. त्यामुळे पुढील काळात मला छोट्या पडद्यावर काम करायला आवडेल. भाभीजी घर पर है या मालिकेतील विभूतीची भूमिका मला साकारायला आवडली असती. कारण त्याचा खोडसरपणा मला खूप भावतो. या मालिकेत माझा एक वेगळा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत मी एका मॉडर्न लुकमध्ये दिसणार आहे. माझे केस सध्या वाढलेले असल्याने मी छोटासा पोनी घालणार आहे तर माझी दाढीदेखील वाढलेली आहे. या मालिकेचे चित्रीकरण करण्याआधी सही पकडे है हा संवाद म्हणण्याचा मी सराव अनेकवेळा केला."