Join us  

नितीश भारद्वाज यांनी पत्नीवर केले गंभीर आरोप, पोलीस आयुक्तांकडे तक्रार करत मागितली मदत 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 1:18 PM

Nitish Bhardwaj News: दूरदर्शनवरील महाभारत या लोकप्रिय मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते नितीश भारद्वाज यांच्या कौटुंबिक जीवनात वादळ आले आहे. भारद्वाज यांनी त्यांची पत्नी आणि मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी स्मिता भारद्वाज यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.

दूरदर्शनवरील महाभारत या लोकप्रिय मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका करणारे प्रसिद्ध अभिनेते नितीश भारद्वाज यांच्या कौटुंबिक जीवनात वादळ आले आहे. भारद्वाज यांनी त्यांची पत्नी आणि मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी स्मिता भारद्वाज यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. स्मिता भारद्वाज ह्या बऱ्याच दिवसांपासून आपला मानसिक छळ करत असल्याचा आरोप नितीश भारद्वाज यांनी केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसाप नितीश भारद्वाज यांनी भोपाळचे पोलीस कमिश्नर हरी नारायण चारी मिश्रा यांना ईमेल पाठवून त्यांच्याकडे मदत मागितली आहे. माझी पत्नी माझा मानसिक छळ करत असून, माझ्या दोन मुलींनाही भेटू देत नाही आहे, असा आरोप नितीस भारद्वाज यांनी केला आहे. नितीश भारद्वाज यांच्याकडून तक्रार मिळाल्यानंतर भोपाळच्या पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या चौकशीची जबाबदारी अतिरिक्त डीसीपी शालिनी दीक्षित यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 

भोपाळचे पोलीस आयुक्त हरी नारायण चारी मिश्रा यांनी नितीश भारद्वाज यांच्याकडून मिळालेल्या तक्रारीला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, आम्हाला नितीश भारद्वाज यांच्याकडून तक्रार मिळाली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. तसेच त्यामधील तथ्य तपासत आहोत. नितीश भारद्वाज हे महाभारत या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. या मालिकेत नितीश भारद्वाज यांनी श्रीकृष्णाची भूमिका केली होती. तसेच त्यांनी काही मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलं होतं.

नितीश भारद्वाज यांनी मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी स्मिता यांच्याशी १४ मार्च २००९ रोजी लग्न केलं होतं. हा त्यांचा दुसरा विवाह होता. दोघांचाही या विवाहापूर्वी पहिल्या जोडीदारापासून घटस्फोट झालेला होता. मित्रांच्या माध्यमातून या दोघांचीही ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी लग्न केलं होतं. या दोघांनाही जुळ्या मुली आहेत. २०२२ मध्ये नितीश भारद्वाज आणि स्मिता हे वेगळे झाले होते.  

टॅग्स :रिलेशनशिपटेलिव्हिजन