Join us  

"नितीन गडकरी की देवेंद्र फडणवीस? भाजपाचा भावी पंतप्रधान कोण?", सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 1:54 PM

Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना सुप्रिया सुळे देणार उत्तर, पाहा व्हिडिओ

छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘खुपते तिथे गुप्ते’. या कार्यक्रमात सेलिब्रिटींबरोबरच राजकीय वर्तुळातील मंडळीही सहभागी होतात. पहिल्या दोन पर्वांना मिळालेला प्रतिसाद बघून अवधूत गुप्ते ‘खुपते तिथे गुप्ते’चा नवा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला. आत्तापर्यंत अवधूतने या मंचावर अनेक कलाकारांसह राजकारणातील नेत्यांनाही बोलतं केलं. अमृता खानविलकर, श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर, उर्मिला मातोंडकर याबरोबरच नारायण राणे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनीही ‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर हजेरी लावली होती. आता खासदार सुप्रिया सुळे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

सुप्रिया सुळेंचे ‘खुपते तिथे गुप्ते’मधील काही प्रोमो व्हिडिओ समोर आले आहेत. खुपते तिथे गुप्तेमध्ये अवधूतने विचारलेल्या वैयक्तिक आणि राजकीय प्रश्नांना सुप्रिया सुळेंनी अगदी स्पष्ट आणि परखडपणे उत्तरं दिल्याचं व्हिडिओत दिसत आहे. या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंना अवधूतने राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीबरोबरच भाजपाच्या नेत्यांबद्दलही प्रश्न विचारले. "भाजपामध्ये भावी पंतप्रधान कोण आहे असं वाटतं? देवेंद्र फडणवीस की नितीन गडकरी?” असा प्रश्न अवधूतने विचारला. यावर सुप्रिया सुळेंनी अगदी स्पष्टपणेच उत्तर दिलं. “नितीन गडकरी” असं त्या म्हणाल्या.

"अजित पवार की देवेंद्र फडणवीस? प्रभावी उपमुख्यमंत्री कोण?" सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

“एक हजारो में मेरी बहना है”, अजितदादांचा Video पाहून भर कार्यक्रमात रडल्या सुप्रिया सुळे

‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये सुप्रिया सुळेंना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा व्हिडिओही दाखविण्यात आला. हा व्हिडिओ पाहून सुप्रिया सुळे भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. अजितदादांच्या आठवणीत भर कार्यक्रमात कॅमेऱ्यासमोरच त्या रडू लागल्या. ‘खुपते तिथे गुप्ते’मधील त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. सुप्रिया सुळे ‘खुपते तिथे गुप्ते’च्या आगामी भागात दिसणार आहेत. हा भाग रविवारी(१७ सप्टेंबर) प्रसारित केला जाणार आहे.

टॅग्स :सुप्रिया सुळेदेवेंद्र फडणवीसनितीन गडकरीराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा