Join us  

‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’मध्ये निशांतसिंग बनला ऍक्शन दिग्दर्शक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 4:52 PM

‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ मालिकेत अक्षत जिंदालच्या भूमिकाच्या माध्यमातून अभिनेता निशांतसिंह मलकाणीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

ठळक मुद्देअक्षतने एक अॅक्शन सीन 200 टक्के ओतून शूट केला

‘झी टीव्ही’वरील ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ मालिकेत अक्षत जिंदालच्या भूमिकाच्या माध्यमातून अभिनेता निशांतसिंह मलकाणीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अलीकडेच निशांतसिंहने या मालिकेतील एका जबरदस्त अ‍ॅक्शन प्रसंगाचे शूटिंग  केले.

मालिकेच्या कथाभागानुसार दत्ता (दिवय धमीजा) आणि पोलिस निरीक्षक पर्व (रीहानव रॉय) हे गुड्डनचे (कनिका मान) अपहरण करतात; पण अक्षत जिंदाल तिची सुटका करतो. हा प्रसंग अधिक वास्तववादी पध्दतीने चित्रीत करावा, अशी सूचना निशांतसिंहने यावेळी केली आणि त्यास दिग्दर्शकाने मंजुरी दिल्यावर त्यात त्याने 200 टक्के सर्वस्व ओतून हा प्रसंग अप्रतिमपणे साकारला.

या हाणामारीच्या प्रसंगाचे दिग्दर्शन करण्याच्या अनुभवाविषयी निशांत सिंह म्हणाला, “या प्रसंगातील मारामारीचं दिग्दर्शन करण्यासाठी सेटवर अ‍ॅक्शन दिग्दर्शक उपस्थित होते. पण मला हा प्रसंग फिल्मी पध्दतीच्या मारामारीने उभा करायचा नव्हता. तेव्हा हा प्रसंग वास्तववादी अ‍ॅक्शनने साकार करण्याची सूचना मी दिग्दर्शकांना केली. या प्रसंगात सुरक्षितता राहाण्यसाठी त्यावर अ‍ॅक्शन दिग्दर्शक देखरेख करीत होते. त्यांनाही माझी कल्पना आवडली आणि त्यांनी याकामी पूर्ण सहकार्य केलं.”

काही दिवसांपूर्वी मालिकेत एका सीन्ससाठी आणलेल्या कबुतरांनी निशांतसिंहला वेड लावले होते. मालिकेतील काम संपल्यावर त्यांच्याशी होणारी ताटातूट आपल्याला सहन होणार नाही, हे लक्षात आल्यावर त्याने या कबुतरांना पाळण्याची सूचना केली. 

टॅग्स :गुड्डन तुमसे ना हो पायेगा