निर्भय वाधवा कलर्सच्या कर्मफलदाता शनिमध्ये हनुमान म्हणून प्रवेश करणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 10:37 IST
प्रत्येक कलाकाराला एकदा तरी त्याच्या करिअरमध्ये छोटा पडद्यावर झळकण्याची इच्छा असते. कारण मालिका विश्वामुळे हे सेलिब्रेटी घरघरात पोहचतात आणि ...
निर्भय वाधवा कलर्सच्या कर्मफलदाता शनिमध्ये हनुमान म्हणून प्रवेश करणार!
प्रत्येक कलाकाराला एकदा तरी त्याच्या करिअरमध्ये छोटा पडद्यावर झळकण्याची इच्छा असते. कारण मालिका विश्वामुळे हे सेलिब्रेटी घरघरात पोहचतात आणि रसिकांना आपलेसे करतात. एकाच मालिकेतून 5 ते 6 वर्ष रसिकांचे मनोरंजन करता करता रसिकांचे आणि कलाकरांचे एक अतुट असे बंध निर्माण होतात.त्यामुळे काही वर्ष अभिनयापासून ब्रेक घेतलेल्या कलाकरांना पुन्हा एकदा छोटा पडदा खुनावू लागतो. त्यामुळे ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा अनेक चेहरे कर्मफलदाता मालिकेत वेगवेगळ्या भूमिकेत झळकले आहेत.निर्भय वाधवाने अनेक पौराणिक शोमध्ये आपल्या अभिनयाने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आपले अस्थित्व निर्माण केले आहे.रसिकांना आनंदित करण्याची अपेक्षा हा अभिनेता पुन्हा एकदा हनुमानाची भूमिका कलर्सच्या कर्म फलदाता शनिमध्ये करताना पहायला मिळणार आहे.झेप घेण्याच्या आधी ही भूमिका बालकलाकार क्रिश चौहान करत होता.पण आता शनि देव आणि हनुमानाच्या संघर्षाच्या कथेचे औत्सुक्य वाढल्यामुळे शोमध्ये प्रौढ हनुमानाची भूमिका करण्यासाठी निर्भयने मान्यता दिली आहे.खरेतर या अभिनेत्याने शनि देव आणि हनुमान देवाच्या संर्घषावर लक्ष केंद्रित करणाऱ्या चित्रीकरणाला सुरूवात सुद्धा केली आहे.या घडामोडीं विषयी निर्भयला विचारले असता त्याने ही गोष्ट खरी असल्याचे सांगीतले आणि तो म्हणाला,“कर्मफल दाता शनि हा शो अतिशय यशस्वी झालेला शो आहे.आणि मी तो अतिशय धार्मिकतेने पाहतो.आता या शोमध्ये सहभागी होण्याचा मला आनंद झाला आहे. मी हनुमानाचा निस्सिम भक्त असून या शोमध्ये तेही हनुमान देवाची भूमिका साकारणे मला अतिशय आवडेल.”हनुमान या शोमध्ये शनिचे जीवन अजून खडतर बनविण्यासाठी रावणाने योजलेल्या कटाचा एक भाग म्हणून प्रवेश करतो.तथापि,जेव्हा हनुमान शनिची हेरगिरी करू लागतो आणि स्वतःला त्याच्याशी लढण्यासाठी तयार करु लागतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या अंतर्गत जाणीवेने गोंधळात पडतो. हनुमानाला अस्पष्टपणे शनिची मित्रता आणि त्यांच्या आठवणी आठवतात.हनुमानाच्या सर्व आठवणी जागृत होतील का किंवा तो शनिशी युद्ध करेल का?अशा सगळ्या गोष्टी रसिकांना या पौराणिक मालिकेतून पाहायला मिळणार आहेत.