ससुराल सिमर का, खिचडी, तमन्ना यांसारख्या मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री निमिषा वखारिया बालिकावधू मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत ती अतिशय कडक स्वभावाच्या स्त्रीची व्यक्तिरेखा साकरणार आहे. या आधीही निमिषाला बालिकावधूच्या प्रोडक्शन हाऊसकडून अनेक मालिकांच्या ऑफर्स आल्या होत्या. पण त्यावेळी तारखा न जुळल्याने तिला त्या मालिका करणे जमले नव्हते. पण आता या प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्याचा तिला अतिशय आनंद होत आहे.
निमिषा बालिकावधूमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 14:45 IST