Join us  

"कॉमेडी म्हणजे खायचं काम नाही..." निलेश साबळेने शेअर केला कलाकरांचा मजेशीर व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 2:03 PM

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम टीव्हीवर पाहताना ज्याप्रकारे मजा येते तशीच मजामस्ती पडद्यामागेही घडत असते.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) काही काळाच्या ब्रेकनंतर पुन्हा सुरु झाला आहे. डॉ निलेश साबळे (Nilesh Sable) यांच्यासह भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, स्नेहल शिदम,रोहित चव्हाण, अंकुर वाढवे ही कलाकार मंडळी प्रेक्षकांना पुन्हा खळखळून हसवत आहेत. दरम्यान निलेश साबळेने नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये तो स्क्रीप्ट वाचून दाखवतोय तर इतर कलाकार खाण्यात मग्न झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल हे नक्की. 

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम टीव्हीवर पाहताना ज्याप्रकारे मजा येते तशीच मजामस्ती पडद्यामागेही घडत असते. प्रत्यक्षात शूट करण्याआधी जी तामील केली जाते सराव केला जातो तेव्हा स्टेजवर नक्की काय घडत असतं याची झलक नुकतीच निलेश साबळेने दाखवली आहे. तो स्क्रीप्ट वाचून दाखवत असताना समोर बसलेले अंकुर वाढवे, स्नेहल शिदम, रोहित चव्हाण, श्रेया बुगडे, भाऊ कदम हे मस्त खाण्यात मग्न असल्याचं व्हिडिओतून दिसून येतंय. हा व्हिडिओ पाहून पोट धरुन हसला नाहीत तर नवलच. 'कॉमेडी म्हणजे खायचं काम नाही असं मला उगीच इतके दिवस वाटत होतं..' असं मजेशीर कॅप्शन त्याने लिहिलं आहे.

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम गेल्या ९ वर्षांपासून प्रेक्षकांना हसवत आहे. यातील सर्वच कलाकारांनी चाहत्यांना आपलंसं केलंय. कित्येक सेलिब्रिटी चला हवा येऊ द्या च्या मंचावर येऊन गेले आहेत. कार्यक्रमाची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही हेच याचं यश आहे.

टॅग्स :चला हवा येऊ द्याभाऊ कदमश्रेया बुगडेटिव्ही कलाकारमराठी अभिनेता