निकी अनेजा वालियाला दिल संभल जा जरा या मालिकेआधी रिश्तो का चक्रव्यूह ही मालिका झाली होती ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 17:01 IST
निकी अनेजा वालियाने अस्तित्व या मालिकेत डॉ. सिमरनची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या ...
निकी अनेजा वालियाला दिल संभल जा जरा या मालिकेआधी रिश्तो का चक्रव्यूह ही मालिका झाली होती ऑफर
निकी अनेजा वालियाने अस्तित्व या मालिकेत डॉ. सिमरनची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या आधी तिने सी हॉक्स, बात बन जाये सांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. पण निकी लग्न करून अमेरिकेला निघून गेली आणि तिने मालिकांमध्ये काम करण्याचे बंद केले. आता ती तब्बल १० वर्षांनंतर दिल संभल जा जरा या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या मालिकेसाठी ती काही महिने मुंबईतच राहाणार आहे. तिच्या मुलांची पूर्ण जबाबदारी या काळात तिच्या पतीने स्वीकारण्याची ठरवली आहे. स्टार वाहिनीवर नुकत्याच दिल संभल जा जरा आणि रिश्तो का चक्रव्यूह या दोन मालिका लाँच झाल्या आहेत. निकीला खरे तर रिश्तो का चक्रव्यूह या मालिकेतील भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण त्याऐवजी तिला दिल संभल जा जरा या मालिकेतील लैला रायचंद ही भूमिका अधिक भावली असल्याने तिने या मालिकेत काम करण्याचे ठरवले. निकी अनेक वर्षं मालिकांपासून दूर असली तरी तिने शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांच्या शानदार या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटात संजय कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होता. संजय दिल संभल जा जरा या मालिकेत तिच्यासोबत काम करत आहे. त्याच्यासोबत पुन्हा दोन वर्षांनी काम करायला मिळत असल्याचा निकीला प्रचंड आनंद होत आहे. या भूमिकेविषयी निकी सांगते, अस्तित्व या मालिकेला आज अनेक वर्षं झाले असले तरी आजही प्रेक्षकांच्या मनात डॉ. सिमरनची भूमिका ताजी आहे. लोकांच्या मनात माझी निर्माण झालेली प्रतिमा मोडीत काढण्यासाठीच मी लैलाची भूमिका स्वीकारली आहे. लैला रायचंद ही अतिशय श्रीमंत स्त्री असून संधीसाधू आहे. आपल्याला जी गोष्ट हवी ती मिळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते असे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लैलाचा स्वभाव माझ्यापेक्षा खूपच वेगळा आहे. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. Also Read : मी अभिनेत्री असल्याचे काही वर्षं तरी विसरले होतेः निकी अनेजा वालिया