Join us

लग्नापूर्वीच प्रेग्नंट आहे निया शर्मा? या फोटोमुळे विचारला जातोय असा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 14:57 IST

सोशल मीडियावर नियाचा फॉलोव्हर्सची संख्या अधिक आहे. 2.8 मिलियन इतके फॉलोव्हर्स असून तिचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो

टेलिव्हिजन सेन्सेशन निया शर्मा तिच्या बोल्ड स्टाइल स्टेटमेंटमुळे ओळखली जाते. यामुळेच तिला मोस्ट  सेक्सी एशियन महिला असलेला बहुमानही मिळाला होता. निया नेहमीच सोशल मीडियावर स्वतःचे बोल्ड फोटो अपलोड करत पब्लिसिटी मिळवत असते. मात्र नियाने एक फोटो शेअर केला आहे. तो फोटो पाहून सारेच तिला प्रेग्नंट असल्याचे प्रश्न विचारताना दिसतायेत. शेअर केलेला फोटो हा एका प्रेग्नंट महिलेचा आहे. ती प्रेग्नंट असल्याचे संकेत हा फोटो तर देत नाही ना असे ना-ना प्रश्न नेटीझन्सना पडले आहेत. 

निया थेट बॉलिवूडच्या प्रवासाला निघतेय.विक्रम भट्ट यांच्या चित्रपटात नियाची वर्णी लागली आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव समोर आलेले नाही. पण भट्ट यांनी या प्रोजेक्टची तयारी सुरू केलीय आणि नियाला साईन केलेय. विक्रम भट्ट यावेळी काहीतरी वेगळे करण्याच्या विचारात आहेत.

 

 

सोशल मीडियावर नियाचा फॉलोव्हर्सची संख्या अधिक आहे. 2.8 मिलियन इतके फॉलोव्हर्स असून तिचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो. 'एक हजारों में मेरी बहना है' या मालिकेमुळे निया शर्मा घराघरात पोहचली होती. तिच्या ऑनस्क्रीन लूकपेक्षा ऑफस्क्रीन लूकचीही चर्चा जास्त रंगते.  

आत्तापर्यंत केलेल्या चित्रपटांपेक्षा एकदम वेगळा चित्रपट आणून  प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का द्यावा, अशी त्यांची योजना आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा शिवाय यातील नियाचा लूक सगळे काही एकदम हटके असणार आहे. तूर्तास नियाच्या अपोझिट कोण दिसणार, हे ठरलेले नसल्याने मेल लीडचे नाव गुलदस्त्यात आहे.