Join us

OMG! थोडक्यात बचावली बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल निया शर्मा, वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 14:00 IST

आशियातील दुस-या सर्वाधिक मादक स्त्रीचा किताब मिळवणारी २७ वर्षांची निया शर्मा थोडक्यात बचावली.

ठळक मुद्देसोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

आशियातील दुस-या सर्वाधिक मादक स्त्रीचा किताब मिळवणारी २७ वर्षांची निया शर्मा थोडक्यात बचावली. दिवाळी पार्टीतील दिव्याने नियाच्या लहंग्याला आग लागली आणि क्षणात लहंग्याने पेट घेतला. नशीब बलवत्तर म्हणून निया थोडक्यात बचावली. जळलेल्या लहंग्याचा फोटो पोस्ट करत नियाने स्वत: या घटनेची माहिती दिली.

‘दिव्याची शक्ती... लहंग्याने पेट घेतला. माझ्या आऊटफिटमध्ये लागलेल्या लेअर्समुळे मी बचावले किंवा कुण्या दैवी शक्तीने मला वाचवले,’ असे या घटनेची माहिती देताना तिने लिहिले. 

दिवाळी पार्टीत नियाने सिल्व्हर कलरचा लहंगा घातला होता. या लहंग्यावर मिरर वर्क केलेले होते. पार्टीत जाण्यापूर्वी या आऊटफिटमधील काही ग्लॅमरस फोटोही तिने शेअर केले होते.

निया ही छोट्या पडद्यावरची ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाते. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. लवकरच ती ‘नागीन 4’ या मालिकेत दिसणार आहे.

सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. 2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.लंडन येथील ‘इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50  ‘मोस्ट सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती. 

टॅग्स :निया शर्मादिवाळी 2022