Join us
Daily Top 2Weekly Top 5

नववधू प्रिया मी... मुक्ता बर्वेचा नव्या नवरीच्या रूपातला फोटो व्हायरल; चर्चा तर होणारच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 07:00 IST

अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा नवरीच्या गेटअपमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा नवरीच्या गेटअपमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे तिने लग्न केले का, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. सध्या तिच्या लग्नाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होताना दिसते आहे. खरेतर मुक्ता बर्वेने खऱ्या आयुष्यात लग्न केले नसून तिने रिल लाइफमध्ये हे लग्न केले आहे.

अभिनेत्री मुक्ता बर्वे सध्या अजूनही बरसात आहे या मालिकेत मीराची भूमिका साकारते आहे. या मालिकेला आणि मुक्ताने साकारलेल्या मीराच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. या मालिकेत मुक्तासोबत अभिनेता उमेश कामत मुख्य भूमिकेत आहे.

सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत मीरा आणि आदिराज कित्येक वर्षांनंतर पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात परत आले आहेत. आदिराज घरच्यांचा दबावामुळे सानिकासोबत साखरपुडा करणार होता. मात्र वेळीच पोहचून मीरा हा साखरपुडा थांबवते आणि सानिकाचे वडील डॉ. वैश्यंपायन यांचे खरे रुप सर्वांसमोर आणते. त्यामुळे हे लग्न मोडते. त्यानंतर आदिराजची आई मीराच्या घरी आदिराजचे मागणे घेऊन जाते. त्यामुळे आता लवकरच मीरा आणि आदिराज लग्नबंधनात अडकणार आहेत. हे आगामी भागात पहायला मिळणार आहे. मुक्ता बर्वेचा नवरीच्या रुपातील फोटो हा या मालिकेतील असून हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे.  

टॅग्स :मुक्ता बर्वेउमेश कामत