Join us

'रंग माझा वेगळा' मालिकेत नवीन ट्विस्ट, दिपावर पुन्हा घायाळ होणार कार्तिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 13:02 IST

'रंग माझा वेगळा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत दीपाने आपल्या साधेपणाने आणि प्रेमळ स्वभावाने रसिकांच्या मनात घर केले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मधील नवनवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत दीपाने आपल्या साधेपणाने आणि प्रेमळ स्वभावाने रसिकांच्या मनात घर केले आहे. कार्तिक आणि दीपा पुन्हा एकत्र यावं अशी कार्तिकी आणि दिपिकाची इच्छा आहे. 

सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होतो. यात कार्तिक कार्तिकी आणि दिपिकाला चॉकलेट देताना दिसतोय. यावेळी दिपिका त्याला थँक्यू अँकल म्हणते. तर कार्तिकी म्हणते बाबा तू आणखी एक चॉकलेट आणायला हवं होतं. कार्तिक तिला विचारतो तुला आणखी एक चॉकलेट हवं होतं का. यावर कार्तिकी म्हणते माझ्यासाठी नाही तर दीपा अँटीसाठी तिनं पण किती छान काम केलं. प्रोमोमध्ये दिपादेखील मुलींसोबत तयार झालेली दिसत.

दिपाचं मनमोहक रुप पाहुन कार्तिक काहीवेळा तिच्याकडे बघतोच राहतो. खरं तर दिपाचं मनमोहक रुप पाहून तो घायाळ होतो आणि तिचं कौतुक करतो. कार्तिक पुन्हा दिपाच्या प्रेमात पडणार का?  त्याच्या नात्याची नव्याने सुरुवात होणार का?, मुलींसाठी दोघे एकत्र येणार का?, दीपिका आणि कार्तिकीमुळे दीपा आणि कार्तिकमधील गैरसमज दूर होऊन ते नवीन आयुष्याला कधी सुरूवात करतील का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.  

टॅग्स :स्टार प्रवाह