Join us  

'रंग माझा वेगळा'मध्ये नवीन ट्विस्ट, मुलींसाठी कार्तिक आणि दीपा येणार एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 12:15 PM

Rang Maza Vegla:'रंग माझा वेगळा' या मालिकेत आता नवीन ट्विस्ट येणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत आता नवीन ट्विस्ट येणार आहे. या मालिकेतील दीपा आणि कार्तिकची जोडी प्रेक्षकांना खूप भावते. या जोडी पुन्हा एकत्र कधी येणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यांच्या मुलींच्या भविष्यासाठी दीपा आणि कार्तिक यांनी एकत्र यावे अशी सर्वांची इच्छा आहे. दीपिका आणि कर्तिकीला देखील वाटते आहे की आपल्याला असे आई- वडील असावेत. मात्र कार्तिक आणि दीपा याबद्दल कधी विचार करतील, असा प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडला आहे.

नुकताच एक मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. यामध्ये दीपिकाला दीपासाऱखी आई हवी आहे. तर कार्तिकीला कार्तिकसारखा बाबा हवा आहे. या दोघींच्या इच्छेसाठी दीपा आणि कार्तिक कधी एकत्र येईल का, याची उत्सुकता सर्वांमध्ये निर्माण झाली आहे. या दोघांचा नेमका निर्णय काय असणार हे पाहणं कमालीचे ठरणार आहे.

दीपिका आणि कार्तिकीमुळे दीपा आणि कार्तिकमधील गैरसमज दूर होऊन ते नवीन आयुष्याला कधी सुरूवात करतील का, हे मालिकेच्या आगामी भागात समजेल. मालिका सध्या नव्या वळणावर आहे. त्यामुळे नवीन ट्वीस्ट पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात.

टॅग्स :स्टार प्रवाह