नव्या अंदाजातील पिंजरा पुन्हा अनुभवता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 04:01 IST
आली ठुमकत नार लचकत... छबीदार छबी मी तोºयात उभी... दिसला ग बाई दिसला... तुम्हावर केली मी ...
नव्या अंदाजातील पिंजरा पुन्हा अनुभवता येणार
आली ठुमकत नार लचकत... छबीदार छबी मी तोºयात उभी... दिसला ग बाई दिसला... तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडुन जाऊ रंग महाल... कशी नशीबानं थट्टा आज मांडली यासारख्या सदाबहार गीतांनी पिंंजरा चित्रपटाच्या शिरपेचात मोरपंख रोवला गेला अन तो सिनेमा सुवर्णाक्षरांनी मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर होऊन गेला. तत्वनिष्ठ व ब्रम्हचारी शिक्षकाची केवळ एका नर्तकिच्या क्षणीक मोहाच्या पिंजºयात अडकुन झालेल्या आत्मिक व सामाजिक अध:पतनाची ही कथा पाहताना अंगावर शहारे अल्याशिवाय राहत नाहीत. श्रीराम लागु यांनी त्यांच्या कसदार अभिनय शैलीच्या जोरावर जो मास्तर पिंजरा मध्ये साकारलाय त्याला कोणाचीच तोड नाही. तर संध्या यांनी केलेली नर्तकिची भुमिका आणि त्यांच्या नृत्याच्या अदांनी तर प्रेक्षकांना घायाळ केले होते. आजही या सिनेमाची जादु कायम असुन तब्बल ४४ वर्षांनंतर पिंजरा हा सिनेमा जुन्या आठवणींना उजाळा देत नव्या अंदाजात, डिजीटलाईज होऊन ७० एम.एम च्या पडद्यावर पुन्हा एकदा रसिकांना पाहता येणार आहे. पिंजराला नवे रुप देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासुन वितरक पुरुषोत्तम लढ्ढा प्रयत्न करीत होते. चंद्रसेना पाटील आणि पुरुषोत्त्म लढ्ढा यांच्या पुष्पक प्रियदर्शनी फिल्म्सने व्ही. शांताराम प्रोडक्शनकडून किरण शांताराम यांच्या सहकायार्ने वितरणाचे हक्क घेतले. प्रसाद लॅबमध्ये या चित्रपटाच्या ओरिजिनल प्रिंटवर प्रक्रिया करत तिचे २ के स्कॅनिंग करत नवी अद्यावत प्रिंट तयार केली. हँड क्लिनिंग, अल्ट्रासॉनिक क्लिनिंग, २ के स्कॅनिंग, आॅडिओ ग्रॅबिंग, कलर ग्रेडिंग, आॅडिओ रीस्ट्रोरेशन या नानविध तांत्रिक प्रक्रिया करून या अभिजात कलाकृतीला आधुनिकतेचा नवा साज चढवला आहे. पिंजरा नव्या रुपात घेऊन येताना कोणत्या आव्हान अन अडचणींना सामोरे जावे लागले यासंदर्भात पुरुषोत्तम लढ्ढा यांनी त्यांचे अनूभव सांगितले. माझ्या आयुष्याची, करिअरची सुरुवात मी १९७२ साली पिंजरा या चित्रपटाच्या वितरणा पासुनच केली. हा चित्रपट करण्याच भाग्य आपल्याला मिळो अस नेहमी वाटायचे. उत्तम लावणीप्रदान चित्रपटाला कधीच मरण नसते ती कलाकृती अभिजात ठरते. त्यासाठी मी सतत किरण शांताराम यांच्याकडे जायचो आणि मला पिंजरा पुन्हा नव्या स्वरुपात करायचाय असे त़्यांना सांगायचो. परंतू संध्या ताईंची याला परवानगी नव्हती व खुद्द व्ही शांताराम यांना त्यांचा चित्रपट दुसºया व्यक्तीला कधी द्यायचा नव्हता अशी कारणे मला मिळायची. एक दिवस किरण शांताराम यांनी मला चित्रपटासाठी परवानगी दिली अन जणु काही व्ही शांताराम यांनीच त्यांना असे करायला सांगितले कि काय असे वाटले. किरण शांताराम म्हणाले, पिंजरा चित्रपट ही एक अजरामर कलाकृती आहे. आजही पिंजरातील संगीत, गाणी गाजत आहेत. कोणताही कार्यक्रम असो या सिनेमातील गाणी गायली जातात अन प्रेक्षकांचा वन्स मोअर देखील या गीतांना मिळतो. पिंजराची मोहिनी आजही कायम असल्याने तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट नव्या रुपात येऊन आजच्या तरुण पिढीने तो पहावा यासाठी आम्ही तो नव्याने तयार केला. चित्रपटाला जेव्हा १९७३ साली नॅशनल अॅवॉर्ड मिळाले तेव्हाच व्ही शांताराम यांनी ठरविले होते हा चित्रपट इतर भाषांमध्ये करायचा. तशी स्क्रीप्ट देखील लिहीली गेली. आता त्याच स्क्रीप्टचा संदर्भ घेऊन इंग्रजी सबटायटल मध्ये चित्रपट अनुभवता येईल. पानिपतकार विश्वास पाटील यांची कन्या प्रियदर्शनी हि देखील पुष्पक-प्रियदर्शनी या प्रोडक्शन कंपनीद्वारे या चित्रपटाशी जोडली गेलेली आहे. तिने रज्जो या हिंदी सिनेमासाठी प्रोडक्शनचे काम पाहिले होते आता प्रथमच मराठी सिनेमासाठी ती काम करित आहे. पिंजरा हा सिनेमा करिअरच्या सुरुवातीला मिळणे यावर माझा विश्वासच बसत नाही. हा सिनेमा मला खरच गिफ्ट मिळाला आहे. आम्ही पिंजराला नाही तर पिंजरा सिनेमाने आम्हाला निवडले आहे याबद्दल आनंद वाटतो. पिंजरा हा युगप्रवर्तक सिनेमा आहे असे विश्वास पाटील सांगतात. या सिनेमासोबत माझ्या अनेक आठवणी जोडल्या आहेत असे सांगताना ते पुढे म्हणतात, मी पाचवीमध्ये असताना हा सिनेमा पाहिला होता. जगदिश खेबुडकर हे तेव्हा माझे शिक्षक होते. यासर्वांशी माझे जवळचे नाते होते. हा सिनेमा मी १०० पेक्षा जास्त वेळा पाहिला असेल. इंटरवल पर्यंत सिनेमा पहावा ते जगदिश खेबुडकर यांच्या शब्दांसाठी आणि इंटरवल नंतर तो पहावा व्ही शांताराम यांच्या कामासाठी आणि लागुंच्या अदाकारीसाठी. पिंजरामध्ये मास्तरांची दमदार भुमिका साकारणारे श्रीराम लागु या चित्रपटाच्या आठवणींमध्ये पार हरवून गेले होते. पिंजरा या नावालाच माझा विरोध होता. शुटिंग सुरु झाल्यानंतर समजले कि हा पिंजरा काही लोखंडाचा नाही तर माणसाच्या जाणीवेचा आहे अन यात माणुस अगदी उत्कृष्टपणे सापडु शकतो. व्ही. शांताराम यांनी माझ्यातील नट जागा केला आणि माझ्याकडुन उत्तम काम करुन घेतल. या माणसाबरोबर मला पहिला चित्रपट करायला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. असेच व्ही शांताराम चित्रपटसृष्टीला लाभो अन चित्रपटाची यशस्वी वाटचाल सुरु राहो. जोपर्यंत अशी माणसे मराठी चित्रपटसृष्टीला मिळतील तोपर्यंत मराठी सिनेमाला मरण नाही. - (श्रीराम लागु)