Join us

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतल्या 'त्या' सीनची नेटीझन्स उडवतायेत खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 15:44 IST

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका सुरु होताच रसिकांची पसंती मिळाली. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या दोघांची जोडीही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' हि मालिका नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आहे. प्रोमोज रिलीज झाल्यापासूनच या मालिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं.श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा ही चिमुकली सुद्धा रसिकांना आपलीशी वाटत आहे. या मालिकेतून प्रार्थना आणि श्रेयस दोघांनीही मराठी टेलिव्हिजन माध्यमात पदार्पण केलंय. आपल्या आवडत्या कलाकारांना ऑनस्क्रीन पाहण्यासाठी रसिकही आतुर होते. 

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका सुरु होताच रसिकांची पसंती मिळाली. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या दोघांची जोडीही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेची कथा आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे मालिका रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतल्या घडामोडी पाहून रसिकही मालिकेचे कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे मालिका नेटीझन्सच्या ट्रोलिंगलाही बळी पडली आहे.  

 

अनेकदा मराठी मालिकांचे बजेट कमी असल्यामुळे तडजोड करताना दिसतात. बजेट जास्त नसल्यामुळे आहे त्या गोष्टीत काम निभावताना मालिका दिसतात. या मालिकेबरोबरही तसेच काही घडले आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिका जितकी रसिकांना आवडत आहेत तितकीच ट्रोलही होत आहे. 

नेटीझन्स सोशल मीडियावर मालिकेतल्या खटकणाऱ्या  सीनची खिल्ली उडवताना दिसतात. या मालिकेमध्ये नुकताच असा काही सीन दाखवण्यात आला की, नेटीझन्सनी त्या सीनवर निशाणा साधत मजेशीर मीम्स व्हायरल केल्याचे पाहायला मिळत आहे. तो सीन तुमच्याही लक्षात आलाच असेल. हेलिकॉप्टरमधला हा खास सीन आहे. खऱ्या हेलिकॉप्टर ऐवजी खोट्या हेलिकॉप्टरमध्ये हा सीन शूट करण्यात आला होता.

 

नेटकऱ्यांनी याच गोष्टीचा मुद्दा पकडला आणि खिल्ली उडवण्यास सुरूवात केली.सगळं काही लझ्करियस दाखवण्याच्या नादात मालिकेकडून चूक झाली आणि चाहत्यांनी ती पुढे निदर्शनास आणूनही दिली. 'हेलिकॉप्टरला रेल्वेच्या खिडक्या आणि कारच्या सीट, तर काहींनी कुठून आणतात हेलिकॉप्टर 😂 सर्व सामान्य लोकांना रिलेटहोईल असं काहीतरी दाखवू शकत नाही का Zee मराठी ! फुकटची अतिशयोक्ती 😂 असे कमेंट करत फुल ऑन मजा घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

 

टॅग्स :श्रेयस तळपदे