Join us  

Bigg Boss Marathi 3 Winner : जिंकलस भावा...!  बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर विशालनं जे केलं ते पाहून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 4:37 PM

Bigg Boss Marathi Season3 Winner Vishal Nikam : हा विजय आपल्या एकट्याला नाही तर सर्वांचा आहे, याचं भान विशाल निकमने दाखवलं. स्टेजवर त्यानं जे काही केलं ते पाहून विशालचे तमात चाहते सुखावले. सध्या याचसाठी त्याचं भरभरून कौतुक होतंय.

Bigg Boss Marathi Season 3 Winner Vishal Nikam :  एका शेतकऱ्याच्या पोरानं काल ‘बिग बॉस मराठी 3’च्या  (Bigg Boss Marathi 3) ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आणि त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. या शेतकऱ्याच्या पोराचं नाव काय तर विशाल निकम (Vishal Nikam). बिग बॉसची ट्रॉफी आणि 20 लाख रूपयांचा धनादेश उंचावताना विशालचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. अर्थात याऊपरही ‘जिंकलो’, हा गर्व नव्हता. हा विजय आपल्या एकट्याला नाही तर सर्वांचा आहे, याचं भान त्याने दाखवलं. स्टेजवर त्यानं जे काही केलं ते पाहून विशालचे तमात चाहते सुखावले. सध्या याचसाठी त्याचं भरभरून कौतुक होतंय.

 महेश मांजरेकरांनी ‘बिग बॉस मराठी 3’चा विजेता म्हणून विशालच्या नावाची घोषणा केली आणि सोबत त्याच्या हातात बिग बॉसची चकाकती ट्रॉफी सोपवली. विशालला ट्रॉफी मिळाल्यानंतर बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांनी मंचावर येऊन एकच गलका केला. सर्वांनी विशालवर शुभेच्छांचा वर्षाव करत, प्रेमानं त्याची गळाभेट घेतली. विशालचा जिगरी यार विकास पाटील व मीनल शाह हे दोघेही यात होते. या दोघांना पाहून विशालने क्षणाचाही विचार न करता आपल्या हातातील बिग बॉसची ट्रॉफी विकास व मीनलच्या हातात दिली. तुमच्यामुळेच हे शक्य झालं, हे विशालच्या या कृतीतून दिसलं.

(व्हिडीओ-साभार@filmyboxmarathi )

विशालनं दाखवलेला हा मनाचा मोठेपणा पाहून नेटकरी त्याचं भरभरून कौतुक करत आहेत.

बिग बॉस मराठी 3 जिंकल्यानंतर विशालने प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले. ‘तुमची साथ आणि माऊलींचा आशीर्वाद, सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार.  आईशप्पथ सांगतो, तुम्ही होतात म्हणून मी इथवर आलो आणि आता ही ट्रॉफी माज्या हातात आहे.  गावातून येणाºया या पोराला तुम्ही आज महाराष्ट्राचा फेव्हरेट केलाय, बिग बॉस सिझन 3 चा विजेता बनवलाय. तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. ही तर फक्त सुरुवात आहे,’अशा शब्दांत विशालने आनंद व्यक्त केला

टॅग्स :बिग बॉस मराठी