Join us

​नेहा पेंडसे कोणासोबत गेली लोणावळ्याला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 17:18 IST

नेहा पेंडसे सध्या मे आय कम इन मॅडम या मालिकेत काम करत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणात दिवसातील अनेक तास ...

नेहा पेंडसे सध्या मे आय कम इन मॅडम या मालिकेत काम करत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणात दिवसातील अनेक तास जात असल्याने तिचा जास्तीत जास्त वेळ हा मालिकेच्या सेटवरच जातो. तिला तिच्या कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना वेळ द्यायला मिळत नाही. पण तरीही या सगळ्यातून वेळ काढून ती तिच्या कुटुंबीयांना वेळ देण्याचा प्रयत्न करत असते.नेहाला शॉपिंग करायला खूप आवडते. तिला चित्रीकरणातून जेव्हा वेळ मिळतो त्यावेळी ती शॉपिंगला जाते आणि मनसोक्त शॉपिंग करते. नेहा सांगते, शॉपिंग करणे आणि कुंटुंबीयांसोबत वेळ घालवणे या दोन्ही गोष्टी मला खूप आवडतात. खरे तर मालिकेच्या चित्रीकरणामुळे मला कुठे जायला मिळत नाही. पण एक दिवस जरी सुट्टी मिळाली तरी मी शॉपिंगसाठी वेळ काढते.नेहाला नुकताच तिच्या चित्रीकरणातून एक दिवसांचा ब्रेक मिळाला होता. यातून वेळ काढून ती लोणावळ्याला फिरायला गेली होती. याविषयी नेहा सांगते, आम्हा कलाकारांना खूपच कमी वेळ स्वतःसाठी देता येतो. मला एकटीला फिरायला खूप आवडते. मला चित्रीकरणासाठी सुट्टी असल्याने मला आराम करायला वेळ मिळाला होता. खरे तर वेळ असल्यास मी माझ्या कुटुंबीयांसोबत फिरायला जाते. पण मी सुट्टीच्या दिवशी एकटीच फिरायला जायचे ठरवले. मी मुंबईहून पुण्याला जात होते. पण लोणावळ्याला पोहोचल्यावर तिथले वातावरण खूपच छान होते. त्यामुळे तिथल्या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी मी काही काळ तिथेच थांबले. नैसर्गिक हवेमुळे तुमच्या मनेला नेहमीच एक प्रकारचा तजेला मिळतो. यामुळे काम करण्यास एक उत्साह निर्माण होतो.