Join us  

नेहा कक्कडची इंडियन आयडलच्या सेटवर फॅन मोमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 2:44 PM

कमल हासन यांच्यासारख्या सुपरस्टारच्या केवळ उपस्थितीमुळे स्पर्धक आपल्या परफॉर्मन्सच्या आधी भांबवून जाणे हे स्वाभाविक आहे. मजा म्हणजे परीक्षक नेहा कक्कड देखील कमल हासन यांच्या उपस्थितीने भारावून गेली होती.

इंडियन आयडल 10 हा भारतातील सर्वात मोठा रिअॅलिटी शो त्यातील सर्वोत्कृष्ट १४ स्पर्धकांच्या मंत्रमुग्ध करणार्‍या परफॉर्मन्सेसमुळे प्रेक्षकांमध्ये गाजत आहे. या वीकएंडला महान नट कमल हासन देखील या शोच्या मंचावर येणार आहेत. या भागात सर्व स्पर्धक आणि हे सुपरस्टार त्यांच्या जीवनातील अशा एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीचे आभार मानतील, ज्यांच्यामुळे ते यश मिळवू शकले आहेत आणि जीवनात या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. कमल हासन यांचा विश्वरूपम २ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यांना या मंचावर येऊन आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या एक दूजे के लिए, सागर वगैरे सारख्या चित्रपटातील गाणी स्पर्धकांनी गायल्यामुळे ते भूतकाळाच्या आठवणीत रमले.

कमल हासन यांच्यासारख्या सुपरस्टारच्या केवळ उपस्थितीमुळे स्पर्धक आपल्या परफॉर्मन्सच्या आधी भांबवून जाणे हे स्वाभाविक आहे. मजा म्हणजे परीक्षक नेहा कक्कड देखील कमल हासन यांच्या उपस्थितीने भारावून गेली होती. जेव्हा नीलांजना रायने मंचावर येऊन कमल हासन यांच्या एक दूजे के लिए या चित्रपटातील ‘तेरे मेरे बीच में’ हे गीत म्हटले, तेव्हा कमल हासन यांनी तिचे तोंड भरून कौतुक केले. इतके अवघड गाणे इतके सफाईदारपणे गायलाबद्दल त्यांनी तिचे अभिनंदन केले. त्यांनी त्या गाण्यातील छोटासा तामिळ संवाद म्हणून तिला साथ देखील दिली. हे पाहून नेहा कक्कडने देखील कमल हासन यांच्यासोबत गाण्याची इच्छा व्यक्त केली. या दक्षिणेच्या सुपरस्टारने या गाण्यातील आपला संवाद पुन्हा म्हटला तेव्हा नेहा कक्कडला झालेला आनंद सगळ्यांनाच जाणवत होता. याविषयी नेहा कक्कड सांगते, “कमल हासन यांच्यासारखा महान सुपरस्टार आमच्या कार्यक्रमात येणे ही एक अद्भुत बाब होती. त्यांची केवळ उपस्थितीच किती प्रेरक होती! मला त्यांच्यासोबत एका मंचावर येता आले हे माझे भाग्यच आहे. शिवाय आम्ही ‘जितने भी तू कर ले सितम’ हे गाणे एकत्र म्हटले. त्यांनी मंचावरील सर्व स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढवला. इंडियन आयडल १० मध्ये त्यांनी येणे यात या कार्यक्रमाचा गौरव आहे.”

टॅग्स :इंडियन आयडॉलकमल हासननेहा कक्कर