मेघना कौशिक अनेक वर्षं जाहिरात क्षेत्रात काम करत आहे. तिने आजवर मिन्त्रा, तनिष, पेपर फ्राय, एसबीआय यांसारख्या मोठ्या ब्रँडसाठी जाहिराती केल्या आहेत. जाहिरात क्षेत्रात स्थिरावल्यानंतर मेघना अभिनयाकडे वळली. तिने बॅरी जॉन्स यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरवले. तिच्यात असलेली अभिनय क्षमता ओळखून या संस्थेने तिला या क्षेत्रात येण्यासाठी चांगलेच मागदर्शन केले. तिने ऑल इंडिया रेडिओवर आर जे म्हणून देखील काम केले आहे. तसेच व्हॉईस आर्टिस्ट म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. ती एक चांगली राईटर देखील आहे. अनेक वर्षं स्ट्रगल केल्यानंतर तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचे तिने सोने केले.‘नीरजा’ चित्रपटात संजनाच्या भूमिकेत मेघना कौशिक झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. आता चित्रपटानंतर ती वेबसिरिजकडे वळली आहे. आयुष रैना यांच्या ‘बेटाखोल’ नावाच्या नव्या वेब मालिकेत प्रतीक बब्बर याच्याबरोबर ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मेघनाने अलीकडेच ‘व्हीआययू क्लिप्स इंडिया’ यांच्यासाठी ‘लव्ह, लस्ट अॅण्ड कन्फ्युजन’ या वेब सिरिजमध्ये रॉक गायिका निकिता डिसुझा ही ग्लॅमरस व्यक्तिरेखा रंगविली होती.‘बेटाखोल’ या वेब सिरिजमध्ये मेघनाने एकदमच वेगळी व्यक्तिरेखा साकारली आहे. तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी असून ती यात अतिशय साध्या वेशात दिसत आहे. या वेब सिरिजमध्ये ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या मुलीची भूमिका साकारत असल्याने तिचा लूकदेखील वेगळा असणार आहे. या वेब सिरिजमध्ये राहुल देव, केन्नी सेबॅस्टियन, लोपामुद्रा राऊत, दीपनिता शर्मा, दियांद्रा सोरेस आणि ईशा कोप्पीकर हे नामवंत कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या वेब सिरिजबद्दल मेघनाशी संपर्क साधला असता ती सांगते, “मला या भूमिकेबद्दल आता कोणतीही माहिती देण्याची परवानगी नाहीये. पण या बेब मालिकेबद्दल मी खूपच उत्सुक आहे. या वेब सिरिजची लवकरच घोषणा केली जाईल, तोपर्यंत माझ्या फॅन्सने प्रतीक्षा करावी एवढेच मी सांगेन.
‘नीरजा’ फेम मेघना कौशिक झळकणार ‘बेटाखोल’ वेबसिरिजमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 15:01 IST