Join us  

‘विठुमाऊली’ मालिकेचे नवरात्री विशेष भाग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 12:04 PM

‘विठुमाऊली’ या मालिकेत रुक्मिणी देवींच्या नऊ रुपांचं दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. कलीला त्याच्या कुकर्मांचं प्रायश्चित देण्यासाठी रुक्मिणीदेवी नऊ रुपं धारण करणार आहेत

ठळक मुद्देनवरात्री विशेष भागांमधूनही स्त्री शक्तीचं विराट दर्शन प्रेक्षकांना घडेल

स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ या मालिकेत रुक्मिणी देवींच्या नऊ रुपांचं दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. कलीला त्याच्या कुकर्मांचं प्रायश्चित देण्यासाठी रुक्मिणीदेवी नऊ रुपं धारण करणार आहेत. विठुमाऊली आणि रुक्मिणीदेवींच्या दिव्यत्वाची प्रचिती मालिकेच्या प्रत्येक भागांमधून होत असते. नवरात्री विशेष भागांमधूनही स्त्री शक्तीचं विराट दर्शन प्रेक्षकांना घडेल. विठ्ठलाचा लाडका भक्त पुंडलिकाला कलीने आतापर्यंत खूप त्रास दिलाय. पुंडलिक विठ्ठलाचा सर्वश्रेष्ठ भक्त होऊ नये यासाठी कलीने बरीच षडयंत्रही रचली. आता वेळ आलीय ती कलीच्या विनाशाची. विठ्ठलाच्या अद्भुत शक्तीचा विसर पडलेल्या कलीने विठ्ठलाला युद्धासाठी आव्हान दिलंय. पण विठुरायासोबत अंतिम युध्द करण्याआधी कलीला नवशक्तींचा सामना करावा लागणार आहे. सत्य विरुद्ध असत्याचा हा लढा विठुमाऊलीच्या नवरात्री विशेष भागांमध्ये प्रेक्षकांना पाहता येईल.

या मालिकेच्या माध्यमातून प्रथमच सावळ्या विठ्ठलावर आणि त्याच्या सख्यांवर आधारित मालिका मराठी टेलिव्हिजनवर पाहायला गेल्या एक वर्षापासून मिळत आहे. संत, भक्ती यांच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाचे माणूसपण, त्याच्या प्रेमाची दुर्लक्षित कथा हे या मालिकेचे वेगळेपण आहे. या आधी ही या आधी ही कोठारे व्हिजनने जय मल्हार, मन उधाण वाऱ्याचे, गणपती बाप्पा मोरया अशा अनेक प्रसिद्ध मालिका छोट्या पडद्याला दिल्या आहेत

टॅग्स :विठुमाऊलीमहेश कोठारेआदिनाथ कोठारे