Join us

नर्गिसचा बॅन्जो संबंधी पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 06:06 IST

 रवि जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटातील रितेश देशमुखच्या लूकची खूपच चर्चा झाली. गेली कित्येक दिवस आपण फेसबुक, इंस्टाग्राम,ट्विीटर अशा सोशल ...

 रवि जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटातील रितेश देशमुखच्या लूकची खूपच चर्चा झाली. गेली कित्येक दिवस आपण फेसबुक, इंस्टाग्राम,ट्विीटर अशा सोशल मिडीयावर बॅन्जो चित्रपटातील रितेशचे फोटो पाहत आहोत. पण नर्गिस फकरी या अभिनेत्रीचा बॅन्जो संबंधी फोटो कधी ही पाहिला नाही. तसेच बॅन्जो संबंधी तिचा फोटो कधी पडणार या प्रतिक्षेत सर्वच प्रेक्षक होते. अखेर ती वेळ आता संपलेली दिसते. कारण बॅन्जो या चित्रपटाचे दिग्दर्शक रवि जाधव यांनी खुद्द सेटवरचा नर्गिस फकरी सोबतचा फोटो सोशलमिडीयावर शेअर केला आहे. त्यामुळे प्रेक्षक मायबापांनी, सुटकेचा श्वास टाकला, कारण शेवटी बॅन्जोमध्ये नर्गिस फकरी आहे हे या फोटोतून सिद्ध झाले आहे.क्योकि, लोग बोलने पर ज्यादा विश्वास नहीं रखते, प्रुफ तो चाहिए ही