नणंद-भावजया आल्या एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 06:02 IST
नणंद - भावजयांच फारस पटत नाही असे सर्रास बोलले जाते. काही अंशी ते खरेही ...
नणंद-भावजया आल्या एकत्र
नणंद - भावजयांच फारस पटत नाही असे सर्रास बोलले जाते. काही अंशी ते खरेही असते. तर काही नणंद - भावजया अगदी मैत्रिणींसारख्या सुद्धा राहतात. अशीच नणंद-भावजयांची जोडी मराठी इंडस्ट्रीतही आहे. पण ही जोडी रिल लाईफ मधील नाही तर रिअल लाईफ मधील आहे. डॉ.प्रकाश बाबा आमटे, अग बाई अरेच्चा यांसारख्या दर्जेदार मराठी चित्रपटातूंन रसिकांवर छाप सोडणारी सोनाली कुलकर्णी आणि तितच्याच ताकदिच्या सशक्त भुमिका पडद्यावर रंगविणारी अमृता सुभाष या दोघी नणंद-भावजया आहेत. नूकता त्यांनी सोशल मिडियावर एक सेल्फी अपलोड केला असुन सोनाली म्हणतीये, नणंद-भावजया दोघी जणी... घरात नव्हत दुसर कोणी... सोनालीच्या या कमेंटवरुन तरी या दोघींच्या नात्यातील मैत्रीच दिसुन येते. एवढेच नाही तर सोनाली अमृताला बेस्ट भटकंती पार्टनही म्हणतीये. आता या रिअल लाईफ मधील नणंद-भावजयांना त्यांचे चाहते नक्कीच रिल लाईफमध्ये एकत्र पाहण्यास उत्सुक असतील.