Join us  

‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात झळकणार नाना पाटेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 4:46 PM

‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ हा कार्यक्रम कलर्स मराठी या वाहिनीवर नुकताच सुरू झाला असून या कार्यक्रमात प्रदीप पटवर्धन, भरत जाधव, केदार शिंदे यांनी नुकतीच हजेरी लावली होती. आता या कार्यक्रमात नाना झळकणार असून ते या कार्यक्रमात खूप साऱ्या गप्पा मारणार आहेत. 

‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात प्रेक्षकांना आता त्यांचे एक लाडके व्यक्तिमत्तव पाहायला मिळणार आहे. नाना पाटेकर यांनी आजवर अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी आणि हिंदी दोन्ही इंडस्ट्रीत त्यांनी आज त्यांचे नाव कमावले आहे. नाना पाटेकरांचे फॅन फॉलॉव्हिंग हे प्रचंड आहे. आपला आवडता कलाकार खऱ्या आयुष्यात कसा आहे. तसेच त्याच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गुपिते लोकांना ऐकायला नेहमीच आवडतात. ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमाद्वारे अनेक कलाकार त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगणार आहेत. आता ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात नाना झळकणार असून ते या कार्यक्रमात खूप साऱ्या गप्पा मारणार आहेत. 

‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ हा कार्यक्रम कलर्स मराठी या वाहिनीवर नुकताच सुरू झाला असून या कार्यक्रमात प्रदीप पटवर्धन, भरत जाधव, केदार शिंदे यांनी नुकतीच हजेरी लावली होती. त्यांनी सगळ्यांनी आपल्या अनेक जुन्या आठवणींना या कार्यक्रमात उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद अनासपुरे करत असून प्रेक्षकांना हा कार्यक्रम चांगलाच आवडत आहे. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात नाना पाटेकर आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहाणार आहे. या भागाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या प्रोमोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपामुळे सध्या नाना पाटेकर चांगलेच चर्चेत आहे. तनुश्रीने त्यांच्यावर केलेले सगळे आरोप खोटे असल्याचे त्यांचे म्हणणे असून त्यांनी तिला वकिलामार्फत नोटिस देखील पाठवली आहे. मीडियाशी बोलताना तनुश्रीचे सगळे आरोप त्यांनी फेटाळून लावले होते. ते म्हणाले होते की, सेटवर १००-२०० लोक हजर होते. या सर्वांसमोर मी तिच्यासोबत गैरवर्तन केले, असे ती का म्हणतेय, मला ठाऊक नाही़ शेवटी कुणी काय बोलाव, हे मी कसे ठरवणार. मी फक्त एवढेचं सांगेल की, कुणी काहीही म्हणो, मला माझ्या आयुष्यात जे करायचे तेच मी करणार... त्यामुळे या कार्यक्रमाचा प्रोमो पाहून आता तनुश्रीच्या या वादाबाबत नाना या कार्यक्रमात काय बोलणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

टॅग्स :नाना पाटेकरमकरंद अनासपुरेतनुश्री दत्ता