Join us  

कुणाल खेमूला या शोमध्ये काम करण्यासाठी सोहा अली खानने मनवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 3:14 PM

अभिनेता कुणाल खेमू लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

ठळक मुद्देकुणाल खेमू आता छोट्‌या पडद्यावरकुणाल खेमू छोट्‌या पडद्यावर करणार सूत्रसंचालन

आपल्या विनोदी अभिनयासाठी मानला जाणारा बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू आता छोट्‌या पडद्यावर पदार्पण करणार आहे. तो  स्टार प्लसवरील कानपुर वाले खुराणाज्‌ या शोमध्ये दिसणार आहे. तो ह्या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. छोट्‌या पडद्यावर आपल्या पदार्पणाचे श्रेय कुणाल आपली पत्नी सोहा अली खान हिला देतो. तिने त्याला हे नवीन माध्यम एक्सप्लोअर करण्यास प्रेरणा दिल्याचे तो सांगतो.

सर्वांचा आवडता कॉमेडियन सुनिल ग्रोव्हरसोबत कुणाल खेमूसुद्धा प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करताना दिसून येईल. याबद्दल कुणाल म्हणाला, “मला कॉमेडी आणि खासकरून स्टॅण्डअप कॉमेडी आवडते आणि मला खूप काळापासून असे काहीतरी करण्याची इच्छा होती. सूत्रसंचालन करणे अभिनयापेक्षा अतिशय वेगळे असून इथे मला लाईव्ह प्रेक्षकांसमोर परफॉर्म करायचे असते. हे थिएटरसारखे आहे. आतापर्यंत मी एक टीव्ही प्रेक्षक होतो, कॉमेडी शोज्‌ पाहायचो. आता प्रथमच मी विरूद्ध बाजूला असणार आहे. जेव्हा मी माझ्या बायकोला ह्या शोविषयी सांगितले, तिने लगेचच मला हा शो स्वीकारायला सांगितला. तिलाही कॉमेडी शोज्‌ खूप आवडतात. ही एवढी खास आणि रोचक भूमिका करण्यासाठी तिने माझे मन वळवले.”स्टार प्लसवरील कानपुर वाले खुराणाज्‌मध्ये कुणाल खेमू कॉमेडी शोमॅन सुनिल ग्रोव्हरसोबत दिसून येईल आणि प्रेक्षकांचे निश्चितपणे तुफान मनोरंजन होईल. कानपुर वाले खुराणाज्‌ हा शो लवकरच स्टार प्लसवर दाखल होणार आहे. कुणालला छोट्या पडद्यावर कॉमेडी करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :कुणाल खेमूसोहा अली खान