Join us  

​मेरे साईच्या सेटवर या कारणामुळे अबीर सुफीला अनावर झाले अश्रू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 10:44 AM

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक उदरनिर्वाहासाठी आपल्या घरापासून लांब राहतात. नाव कमावण्याच्या विवंचनेत अडकलेली आपल्यासारखी अनेक माणसे आपले प्रियजन, ...

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक उदरनिर्वाहासाठी आपल्या घरापासून लांब राहतात. नाव कमावण्याच्या विवंचनेत अडकलेली आपल्यासारखी अनेक माणसे आपले प्रियजन, आई-वडील, भावंडं आणि मित्र-मंडळींसोबत वेळ घालवण्याचे विसरूनच गेले आहेत. पण पूर्वीच्या काळी लोक त्या दिव्य सत्याच्या आणि परमशान्तीच्या शोधार्थ घर सोडून दूर जात असे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई मालिकेत आता अशाच स्वरूपाचे कथानक सादर होणार आहे. देवेदासाचा शिष्य दामोदर आपल्या वृद्ध आई-वडिलांना घरी सोडून देवाच्या शोधात आपल्या गुरूचे अनुसरण करण्यासाठी घराबाहेर पडला आहे. मालिकेतील एका आगामी दृश्यात साई बाबा दामोदरला हे समजवतात की, तो त्याच्या आई-वडिलांना एकटे सोडून आला आहे, वास्तविक त्यांच्या म्हातारपणात त्यांची देखभाल करणे हे दामोदरचे कर्तव्य आहे. या दृश्याचे चित्रीकरण करताना साईंची भूमिका साकारणारा अबीर सूफी खूप भावनिक झाला आणि त्याचे डोळे पाणावले. अबीर स्वतः आपल्या अभिनयाची कारकीर्द घडविण्यासाठी मुंबईत राहात आहे आणि त्याची आई उत्तर प्रदेशातील एका गावात राहते. त्यामुळे या दृश्याचे चित्रीकरण करताना त्याला आईची प्रचंड आठवण येत होती. याविषयी अबीर सांगतो, “माझ्या आईवर माझे प्रचंड प्रेम आहे. केवळ तिच्या आशीर्वादामुळेच मला राष्ट्रीय टेलिव्हिजनवर साईंची भूमिका साकारण्याची ही मोठी संधी मिळाली आहे. मालिकेचे चित्रीकरण मुंबईत होत असल्यामुळे मी इथे माझ्या आईपासून दूर राहतो आहे. कथानकात, जेव्हा मी दामोदरला माता-पित्याचे महत्त्व समजावून सांगत होतो, तेव्हा माझ्या आईच्या आठवणीने मी कासावीस झालो. मला घडवण्यासाठी तिने किती त्याग केला आहे हे मला जाणवले. आपल्या माता-पित्यांच्या आशीर्वादाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. मी लगेच माझ्या आईला फोन केला आणि तिला विमान पकडून मुंबईस येण्यास सांगितले. मी माझ्या मालिकेच्या चित्रीकरणामुळे गावी जाऊ शकत नव्हतो, म्हणून मी तिला इकडे येऊन मला भेटण्यास सांगितले आणि ती देखील लगेचच माझ्या या गोष्टीसाठी तयार झाली.”Also Read : प्यारेलालजी यांनी ‘मेरे साई’साठी तयार केले गीत