Join us

'माझा नवरा मला मारतो?' असं का म्हणाली प्रार्थना; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 13:05 IST

Prarthana behere: प्रार्थनाने केलेलं व्यक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हे नेमकं प्रकरण काय आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

प्रार्थना बेहरे हे नाव आता कलाविश्वाला आणि प्रेक्षकांसाठी नवीन राहिलेलं नाही. उत्तम अभिनयकौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रार्थनाने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सिनेमा, मालिका यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रार्थनाने नुकतंच तिचं युट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. या चॅनेलच्या माध्यमातून ती तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करणार आहे. यामध्येच तिने एक टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये तिने तिच्या नवऱ्याविषयी केलेलं एक विधान चर्चेत आलं आहे.प्रार्थना बऱ्याचदा तिच्या नवऱ्यासोबतचे म्हणजेच अभिषेक जावकरसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. या पोस्टमधून कायम त्यांच्यातील प्रेम दिसून येतं. मात्र, यावेळी तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने चक्क माझा नवरा मला मारतो, असं म्हटलं आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा तिच्याकडे वेधल्या आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

प्रार्थनाने तिच्या युट्यूब चॅनेलवर तिच्या नव्या एका व्हिडीओचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये तिने तिच्या फिल्मी करिअरविषयी आणि खासगी आयुष्याविषयी काही गोष्टी थोडक्यात शेअर केल्या आहेत. तिच्या या टीझरवरुन येणाऱ्या व्हिडीओमध्ये ती नेमकं कोणत्या गोष्टींवर भाष्य करणार याचा अंदाज लावला जात आहे.

माझ्यासाठीची आव्हानात्मक भूमिका कोणती? माझं प्रेमप्रकरण होतं का?  माझा नवरा मला मारतो का?, असे प्रश्न तिनेच स्वत:ला विचारले असून येत्या व्हिडीओमध्ये या प्रश्नांची उत्तरं ती देणार आहे.

दरम्यान, प्रार्थनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर हा टीझर शेअर करत तिने चाहत्यांना तिच्या नव्या युट्यूब चॅनेलला भेट देण्याची विनंतीही केली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी