या गायकासह 'नागार्जुन एक योध्दा' मालिकेतील कलाकार झळकणार म्युझिक अल्बममध्ये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 17:32 IST
'नागार्जुन एक योध्दा' फेम मृणाल जैन सध्या सातवे आसमान पर है त्याला कारणही तसे खासच आहे.त्याने नुकतेच एका अल्बमसाठी ...
या गायकासह 'नागार्जुन एक योध्दा' मालिकेतील कलाकार झळकणार म्युझिक अल्बममध्ये?
'नागार्जुन एक योध्दा' फेम मृणाल जैन सध्या सातवे आसमान पर है त्याला कारणही तसे खासच आहे.त्याने नुकतेच एका अल्बमसाठी हिमेश रेशमीयाँसह काम केले आहे. मृणालसाठी अल्बममध्ये काम करण्याची ही काही पहिली वेळ नव्हती या आधीही त्याने डीजे शेरगीलसह एका म्युझिक अल्बमध्ये झळकला होता. आणि आता पुन्हा एकदा म्युझिक अल्बमसाठी हिमेश रेशमीयाँसह झळकणार असल्यामुळे मृणाल सध्या खूप खुष आहे.आशिक बनाया आपने,तेरा सुरूर ही हिमेशने गायलेली गाणी मला खूप आवडतात.त्याच्यासह काम करणे म्हणजे एक मोठ्या बँडसह काम करण्यासारखे असल्याचे मृणालने सांगितले. विशेष म्हणजे या व्हिडीओ अल्बमसाठी मृणालच्या लुक कसा असावा यावर हिमेशनेच खूप मेहनत घेतलीय.त्याच्या अल्बममध्ये असणारे कॅरेक्टर हे एक श्रीमंत कसिनो मालकाचा लुक हवा होता.त्यामुळे हिमेशने मृणालला टक्सेडो आणि लेन्सेस घालायला सांगितले.या व्हिडीओत मृणालचा फारसा मोठा रोल छोटा असला तरी तो उठून दिसावा यासाठी हिमेशने मृणावर मेहनत घेतल्याचे मृणालने सांगितले.मी टीपीकल हिरोसारखा दिसत नाही माझी शारिरक ठेवणही उत्तम आहे.त्यामुळे हिमेशला माझा लुक आवडला आणि माझी निवड या अल्बमसाठी करण्यात आली असे मृणाल जैनने सांगितले. इतकेच नाहीतर खुद्द हिमेसने त्याचे हेअरस्टाईलिस्ट आणि मेकअपआर्टीस्टना मृणालच्या लुकवर काम करायला सांगितले होते.त्यामुळे माझ्या हटके लुकसाठी हिमेसचा मोठा वाटा आहे.त्यामुळे माझ्या लुकला चाहत्यांकडून खूप चांगल्या कंमेंटस मिळतायेत. त्याचप्रमाणे माझा हा अल्बमही रसिकांना आवडेल अशी आशा आहे. सध्या 'नागार्जुन एक योध्दा' मालिकेत मृणाल जैन दुहेरी भूमिका साकरतोय.