Join us

'वीकेंड का वार'च्या आधीचं 'ही' अभिनेत्री झाली बेघर, फिनालेपूर्वी बाहरेचा रस्ता दाखवल्याने चाहत्यांना बसला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 13:01 IST

आता एक मोठ अपडेट समोर आलं आहे.

जसे-जसे शेवटचे दिवस जवळ येत आहेत, तसे-तसे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 17'मधील स्पर्धकांची संख्या कमी होत आहे. आता बिग बॉसच्या घरात आठ स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. त्यापैकी चार एलिमिनेशनला सामोरे जाणार आहेत.  पण आता एक मोठ अपडेट समोर आलं आहे. 'वीकेंड का वार'च्या आधीचं एका स्पर्धकाला घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 

'बिग बॉस 17'च्या घरात प्रत्येक स्पर्धक मोठ्या जिद्दीने टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अभिनेत्री आयशा खान हिला मात्र शोमध्ये दिर्घ काळ टिकून राहता आलं नाही.  फिनालेपूर्वी ती ‘बिग बॉस’मधून बाहेर पडली आहे. आयशा खानला घरातून काढून टाकण्यात आल्याची बातमी 'द खबरी'ने केलेल्या ट्विटमध्ये देण्यात आली आहे.

बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना बोलवण्यात आले होते आणि एक शो आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये घरातील सदस्यांना चाहत्यांचे मनोरंजन करायचे होते. शोनंतर प्रेक्षकांचा कौल आला आणि आयशा खानला  सर्वात कमी मते पडल्यामुळे बाहेर काढण्यात आले. मात्र, याबाबत अद्याप कलर्स टिव्हीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आयशा खानची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. ती मुनव्वर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड आहे आणि तिने स्टँड-अप कॉमेडियनवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. तर आता येत्या 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खान कोणाची शाळा घेणार आणि कोण घराबाहेर पडणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विकी जैन आणि ईशा मालवीय या दोघांपैकी एक जण बाहेर पडू शकतो, असे अंदाज चाहत्यांनी वर्तवले आहेत. 

टॅग्स :अंकिता लोखंडेसेलिब्रिटी