Join us  

तुम्ही दाढीमिशा वाढवून, ‘कॉस्च्यूम’ बदलून गोसावी झालात...! किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 2:04 PM

Kiran Mane Facebook Post : ‘मुलगी झाली हो’ मालिकेतला विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जाम चर्चेत आहे.

ठळक मुद्दे किरण माने यांना कोरोनाची लागण झाली आहे.मालिकेच्या शूटिंगमुळे ते गुजरातला गेले होते. तिथेच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

‘मुलगी झाली हो’ मालिकेतला विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जाम चर्चेत आहे. तुकोबांच्या एका अभंगाचा संदर्भ देत, किरण माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे उपरोधिक टीका केली आहे. अर्थात आपल्या या पोस्टमध्ये त्यांनी मोदींचा कुठेही नामोल्लेख केलेला नाही. सध्या त्यांची ही पोस्ट तुफान व्हायरल होतेय.  जगात किर्ती व्हावी, नाव व्हावं, मान मिळावा म्हणून तुम्ही दाढीमिशा वाढवून, कॉस्च्युम बदलून गोसावी झालात. ‘खरा’ गोसावी ज्ञानी असतो. तुम्ही दाढीबरूबर ग्यान तरी वाढवायचं, त्याचा पत्ताच नाय, असे लिहित किरण मानेंनी अप्रत्यक्षपणे मोदींवर ताशेरे ओढले आहेत.

वाचा, किरण मानेंची पोस्ट त्यांच्याच शब्दांत......लोकांना गंडवायला हातभर दाढीमिशा वाढवून खोटे साधूगोसावी बनून गांवोगांव हिंडफिरण्यासारखं भटकनारे...  मोठमोठ्या आवाजात पोकळ ग्यान वाटनारे...प्रसिद्धीसाठी हपापलेले भोंदू साधूगोसावी तुकोबाच्या काळातबी होते भावांनो ! व्हय ! तुमाला ठावं हाय किरण माने खोटं बोलनार नाय. क्वारंटाईन असताना तर आज्जाब्बात नाय. खरंच त्याकाळात - चारशे वर्षांपूवीर्बी अस्ली बेनी होती. पन एकदा का आपल्या तुकोबारायाच्या रट्ट्यात असले थापाडे सापडले की सुट्टी नसायची भावांनो !‘जगी कीर्ती व्हावी । म्हणोनि झालासी गोसावी ।।बहुत केले पाठांतर । वर्म ते राहिले दूर ।।चित्ती नाही अनुताप । लटिके भगवे स्वरूप ।।तुका म्हणे शिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा ।।’साल्यांनो, जगात किर्ती व्हावी, नाव व्हावं, मान मिळावा म्हणून तुम्ही दाढीमिशा वाढवून, ‘कॉस्च्यूम’ बदलून गोसावी झालात... ‘खरा’ गोसावी ज्ञानी असतो. तुमी दाढीबरूबर ग्यान तरी वाढवायचं !  त्याचा पत्ताच नाय. नुस्तं काय बोलायचं त्याचं पाठांतर करून, ज्या राज्यात / गांवात जायचंय तिथली जुजबी भाषा फिषा शिकून नाटकं केलीत. पन पाठांतर केलेल्या त्या शब्दांमधलं ‘खरं वर्म’ तुम्हाला घंटा कळ्ळं नाय हराम्यांनो ! ते ‘सार’ तुमच्यापास्नं लांबच रहायलं.   ...काय हाय म्हायतीय का? तुमच्यात ‘संवेदनशीलता’च नाय... ‘मानवता’ नाय... त्यामुळ तुमच्या कुठल्याच कृतीतनं ‘पश्चात्ताप’ दिसत नाय कारन तो तुमच्या ‘चित्तातच’ नाय भिकारचोटांनो, बाहेर तरी कुठनं दिसणार??? तुकोबाराया शेवटी त्याला म्हणतात ‘अरे शिंदळीच्या’... अरे शिंदळीच्या लेका, तुला एक गोष्ट म्हाईत नाय बेट्या...  तू आतापर्यंत ही जी तोंडाची वाफ घालवलीयस ना.. ती सगळी व्यर्थ गेलीय...सगळं वाया गेलंय... तुज्या झोळीत ख-या अर्थानं कायबी पडनार नाय... जी भोळीभाबडी जन्ता तू गंडवतोयस तिला एक ना एक दिवस तुझं खरं विद्रूप रूप दिसनारच ! कळनार समद्यांना की ह्यो मानूस म्हंजी ‘बड्या-बड्या बाता.. गांड खाय लाथा.’ त्यानंतर मात्र तुला ह्या जगात कुठंच-कुणीच मान देणार नाय.. आणि यवढंच नाय तर ह्या असल्या भामट्याला देवसुद्धा जवळ करनार नाय.लिख के ले लो !!तुकाराम महाराज की जय !!! माझी तब्येत ठनठनीत हाय दोस्तांनो... एकांतात तुकोबारायासारखा दोस्त नाय ! ते चित्रे कायतरी म्हंत्यात बघा, तसं.. ‘माझी इट्टलाशी थेट वळख नाय, तुकोबाशी हाय. आन तुकोबाला इठोबा वळखतो म्हनं !’लब्यू ?? ? - किरण माने.

टॅग्स :किरण माने