Join us

मुक्ता युवागिरीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 17:00 IST

युवागिरी या मालिकेत यंदाच्या आठवड्यात मुक्ता बर्वे झळकणार आहे. या मालिकेत दर आठवड्याला विविध सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. आता ...

युवागिरी या मालिकेत यंदाच्या आठवड्यात मुक्ता बर्वे झळकणार आहे. या मालिकेत दर आठवड्याला विविध सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. आता युवागिरीची टीम मुक्ता बर्वेच्या कोडमंत्र या नाटकाच्या प्रयोगाच्या ठिकाणी पोहोचणार आहे. युवागिरीच्या टीमसोबत मुक्ता खूप मजामस्ती करणार आहे. तसेच कोडमंत्र या तिच्या नाटकाच्या निर्मितीचा अनुभवही प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहे. युवागिरीची टीम मुक्ताला तिचा आवडता सहकलाकार कोण, अभिनेता कोण असे प्रश्न विचारून भंडावून सोडणार आहे. हे प्रश्न ऐकल्यावर कोणत्या कलाकाराचे नाव घेऊ असा मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहाणार आहे.