मुक्ता बर्वेचा हा व्हिडीओ, एक पब्लिसीटी स्टंट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 17:05 IST
चाहत्यांनी मुक्ताविषयी चिंता व्यक्त केली तर काहींनी मुक्ताचा हा आगामी प्रोजेक्ट असल्याचं म्हटलयं. तर काहींनी याला पब्लिसीटी स्टंट तर नाही ना? असे अनेक प्रकारचे प्रश्न विचारताना पाहायला मिळतंय.मात्र या सगळ्या प्रश्नांवर मुक्ताकडून कोणत्याच प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाहीय.
मुक्ता बर्वेचा हा व्हिडीओ, एक पब्लिसीटी स्टंट?
अभिनेत्री मुक्ता बर्वेने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये ती काहीशी घाबरलेली दिसतेय.या व्हिडीओच्या सुरूवातीलाच मुक्ती हा व्हिडीओ तुमच्या हाती लागला असेल तर त्याच्या तीन शक्यता आहे,एक तर मी तुरूंगात आहे, किंवा मग मला कोणी किडनॅप केलंय,किंवा माझा खुन झालाय मी तुम्हाला सत्य सांगणार आहे,सत्य कळायलाच हवं असं बोलताना ती दिसतंय.या व्हिडीओत तिच्या डोक्यावर मार लागल्याचे पाहायला मिळतंय रक्तबंबाळ झालेली मुक्ताचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही व्दिधा मनस्थितीत पडाल.हा व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून वॉटसअॅप,फेसबुक,इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर होतोय.मुक्ताच्या व्हिडीओला अनेक प्रतिक्रीयाही पाहायला मिळतायेत.ब-याच चाहत्यांनी मुक्ताविषयी चिंता व्यक्त केली तर काहींनी मुक्ताचा हा आगामी प्रोजेक्ट असल्याचं म्हटलयं. तर काहींनी याला पब्लिसीटी स्टंट तर नाही ना? असे अनेक प्रकारचे प्रश्न विचारताना पाहायला मिळतंय.मात्र या सगळ्या प्रश्नांवर मुक्ताकडून कोणत्याच प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाहीय. 'हृदयांतर' सिनेमाच्या निमित्ताने सिएनएक्स मस्तीला दिलेल्या खास मुलाखतीत ती टीव्ही मालिकांमध्ये झळकणार असल्याचे मुक्ताने माहिती दिली होती. त्यानुसार सिएनएक्स मस्तीच्या हाती लागलेल्या माहितीनुसार मुक्ताचा हा व्हिडीओ एक पब्लिसिटी स्टंट आहे. छोट्या पडद्यावर ती एका मालिकेच्या निमित्ताने रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्याच मालिकेची पब्लिसीटी मुक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओतून केलेली आहे.मुक्ताच्या व्हिडीओतून मालिका सस्पेंस,थ्रीलर असण्याची शक्यता वाटतेय. मालिकेचे नाव सध्या गुलदस्त्यातच असून लवकरच याविषयी अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तुर्तास मुक्ताला तिच्या या नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा.Also Read:मुक्ता बर्वे लवकरच दिसणार छोट्या पडद्यावर