Join us  

एमटीव्ही लव्ह स्कूल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2018 9:49 AM

एमटीव्ही त्यांचा डेटिंग अॅण्ड रिलेशनशिप रिअॅलिटी शो- एमटीव्ही लव्ह स्कूल सीझन थ्री, पॉवर्ड बाय एंगेज डिओज अॅण्ड परफ्युम आणि को-पॉवर्ड ...

एमटीव्ही त्यांचा डेटिंग अॅण्ड रिलेशनशिप रिअॅलिटी शो- एमटीव्ही लव्ह स्कूल सीझन थ्री, पॉवर्ड बाय एंगेज डिओज अॅण्ड परफ्युम आणि को-पॉवर्ड बाय अलोफ्रूट- घेऊन आला आहे. लव्ह प्रोफेसर्स म्हणून टीव्ही जगतातील हॉटेस्ट कपल करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर यांनी जोडप्यांना नाते समृद्ध करण्यात तसेच आपले बंध दृढ करण्यात मदत करण्याची जबाबदारी घेतली आहे. हा शो १२ मेपासून दर शनिवारी केवळ एमटीव्हीवर प्रसारित होईल. एमटीव्ही लव्ह स्कूल ही गोंधळात सापडलेल्या आणि नातेसंबंध सुधारण्याची तीव्र गरज असलेल्या जोडप्यांसाठी एक इन्स्टिट्यूट आहे. अनुरूपतेचा अभाव असो किंवा विश्वासाची कमतरता किंवा एकनिष्ठता वा जवळिकीबद्दलच्या समस्या असोत, जोडप्यांची या सर्व निकषांवर गमतीशीर उपक्रमांच्या माध्यमातून चाचणी घेतली जाईल. याचा उपयोग त्यांना आपल्या जोडीदाराला अधिक चांगल्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी होईल. सध्याच्या काळात फोमोचे वर्चस्व वाढलेले असतानाच, सोलमेटच्या शोधात असलेल्या सिंगल्समुळे निर्माण झालेल्या अतिरिक्त आव्हानालाही जोडप्यांना तोंड द्यावं लागेल. त्यांच्या नात्याचं पाणी जोखण्यासाठी सिंगल्स आव्हानाची एक उत्तम पार्श्वभूमी तयार करतील. आपण खरोखर एकमेकांचे आहोत का की आपल्याला आणखी शोध घेण्याची गरज आहे हे जोडप्यांना या सिंगल व्यक्तींमुळे तपासून बघता येईल. जोडप्यांना केवळ हृदयाच्या गुजगोष्टींबाबतच ज्ञान दिले जाणार नाही, तर आयुष्यात सिंगल व्यक्तींचा प्रवेश झाल्यानंतर आपल्या जोडीदाराच्या एकनिष्ठतेची खोली तपासण्याचेही धडे मिळतील. सिंगल व्यक्तींनाही त्यांनी भूतकाळात केलेल्या चुकांतून बाहेर येऊन सर्वकाही नव्याने सुरू करण्याची संधी मिळेल.या शोचे सूत्रसंचालन दुसऱ्यांदा करणारा करण कुंद्रा म्हणाला, “प्रेम ही अस्तित्वात असलेल्या भावनांपैकी सर्वांत सुंदर भावना आहे. मात्र, वेळ आणि अज्ञान यांमुळे जोडप्यांच्या आयुष्यात अगदी क्षुल्लक गोष्टीही कटू सत्यांसारख्या वाटू लागतात. जोडप्यांना त्रास देणारे हे मुद्दे एमटीव्ही लव्ह स्कूलच्या माध्यमातून समजून घेण्याचे आणि ते त्यांच्या नात्याला निदान एक संधी देतील याची काळजी घेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या सीझनमध्ये एक रोमांचक तिढा असल्याने मी याची उत्सुकतेने वाट बघत आहे. जोडप्यांच्या आधीच हललेल्या नंदनवनात सिंगल व्यक्तींचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे आपले विश्व सावरणे त्यांच्यासाठी आणखी कसोटीचे होणार आहे.” “एमटीव्ही लव्ह स्कूल सीझन थ्री जोडण्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील परिस्थितीवर आधारित असून,जोडप्यांच्या आयुष्यात सिंगल व्यक्तींचा प्रवेश करून देणार आहे. यामुळे जोडप्यांना- खरोखरच माझ्यासाठी कुणी अधिक चांगला जोडीदार आहे का- या प्रश्नाच्या आधारे त्यांचं नातं पुन्हा एकदा तपासून बघता येईल,” असे अनुषा दांडेकर म्हणाली. हृदय तोडण्यापासून आणि जोडण्यापासून ते एक नवी प्रेमकथा लिहिण्यापर्यंत सर्वकाही सामावणारा एमटीव्ही लव्ह स्कूल सीझन थ्री प्रेक्षकांना प्रेमाच्या एका अनोख्या सफरीवर घेऊन जाणार आहे. या नवीन स्वरुपामुळे हा शो खूप रोमांचक आणि आश्चर्याचे धक्के देणारा होणार आहे. त्याचप्रमाणे यात भाग घेणाऱ्यांना तसेच प्रेक्षकांनाही आपल्या प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल यातून धडे मिळणार आहेत.