छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका पांड्या स्टोरमधील अभिनेता अक्षय खरोडियाने १९ जून रोजी त्याची गर्लफ्रेंड दिव्या पुनेठासोबत विवाह केला. नुकतेच त्यांच्या लग्नाला एक महिना झाला आहे. दरम्यान अक्षय खरोडियाने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ही पोस्ट पाहून अक्षय आणि दिव्या यांच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटले जात आहे.
अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे सर्वांना धक्का बसला आहे. त्याने या पोस्टमध्ये ‘एक मोहब्बत थी’ असे म्हटले आहे. त्यासोबतच हॅशटॅगचा वापर करत हार्टब्रोकन असेही लिहिले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टवरुन लग्नाच्या महिनाभरातच अक्षय आणि दिव्या यांच्या नात्यात कटुता तर आली नाही ना असे म्हटले जात आहे.
लग्नातील अक्षय आणि दिव्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अक्षयने त्याच्या व्हायरल होणाऱ्या वृत्तांना अखेर पोस्ट शेअर करत पूर्णविराम लावला आहे.