स्टार प्लसवरील 'नजर' हि मालिका आधुनिक भारतातील एक सुपरनॅचरल फँटसी नाट्य असून चेटकीण काळ्या शक्तींबद्दल बोलते आणि राठोड कुटुंबीयांवर त्याचा कसा परिणाम होतो हे दाखवण्यात आले आहे. लोकप्रिय अभिनेत्री मोनालिसा ह्या मालिकेत चेटकीण मोहनाची भूमिका साकारत आहे. हल्लीच तिला फिटनेसबद्दल आवड वाटू लागली असल्याने ती त्यात कामाचाही अडथळा येऊ देत नाही. दीर्घकाळ कामामध्येही ती व्यायामासाठी थोडा वेळ काढते आणि शॉट्सच्या दरम्यान वर्कआऊट करते. सूत्रांनी सांगितले, “मोनालिसा अजिबात वेळ वाया घालवत नाही. तिला फिट राहायला आवडते त्यामुळे तिचा शॉट झाला की ती डान्स वर्कआऊट किंवा योगा करते. वर्कआऊट करून तिला आनंद मिळतो आणि काही कॅलरीज बर्न केल्याचे समाधान मिळते.” फिटनेस प्रेमी मोनालिसा मोहनाच्या रूपात ऑनस्क्रीन आपल्या चार्मवर काम करत असून प्रेक्षकांना त्यांच्या खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी सज्ज आहे.
नजर या मालिकेत मोनालिसा सोबतच स्मिता बन्सल, इशिता धवन, कपिल सोनी यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. मोनालिसाला भोजपुरी चित्रपटांमध्ये प्रचंड मागणी असून तिने आजवर अनेक भोजपुरी तसेच काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आता प्रेक्षकांना ती एका वेगळ्याच रूपात आणि भूमिकेत पाहायला मिळेल.