सोहल घेणार मिकाची जागा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 13:36 IST
कॉमेडी नाईटस लाइव्ह या मालिकेतून मिका सिंगची हकालपट्टी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या एका व्हिडिओच्या प्रमोशनसाठी मिकाने द ...
सोहल घेणार मिकाची जागा?
कॉमेडी नाईटस लाइव्ह या मालिकेतून मिका सिंगची हकालपट्टी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या एका व्हिडिओच्या प्रमोशनसाठी मिकाने द कपिल शर्मा शोमध्ये उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्याने कपिल हा सगळ्यात चांगला कॉमेडियन असल्याचे म्हटले होते. या कारणावरून कॉमेडी नाईटस लाईव्हसोबत त्याचा असलेला करार रद्द करण्यात आला असल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमात मिकाची जागा आता सोहेल खान घेणार असल्याचे म्हटले जात आहे. कॉमेडी सर्कस या कार्यक्रमात सोहेलने परीक्षकाची भूमिका साकारली होती. तेव्हापासूनच कृष्णा अभिषेकसोबत सोहेलचे खूप चांगले ट्युनिंग आहे. त्याचमुळे सोहेलचा विचार केला जात असल्याची चर्चा आहे.