Join us

मलेशियामध्ये या कलाकारांच्या 'हानीकारक' वेळेविषयी जाणून घ्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 16:40 IST

करणची परदेशातील पहिली ट्रीप आहे आणि मलेशियाला भेट देण्‍यासाठी तो खूपच उत्‍सुक असल्याचे त्याने म्हटले होते.

छोट्या पडद्यावरील 'मेरी हानीकारक बिवी' या मालिकेत आता ट्विस्ट पाहाला मिळणार आहे. या मालिकेच्या एका महत्वपूर्ण टप्‍प्‍याच्या शूटिंगची तयारी पूर्ण झाली आहे. आता अखिलेशच्‍या आयुष्‍यातील सर्वात मोठी शस्‍त्रकिया पार पडणार आहे. ही वॅसेक्‍टोमी रिव्‍हर्सल शस्‍त्रक्रिया मलेशिया येथे करण्‍यात येणार आहे. चार मुख्‍य व्‍यक्तिरेखा अखिलेश (करण सूचक), इरा (जिया शंकर), देविना (अंजली मुखी) आणि पुष्‍पा (सुचेता खन्‍ना) या आठवड्यात मलेशियाला जाणार आहेत. 

या आकर्षक ट्रीपविषयी बोलताना अखिलेश ऊर्फ करण सूचक म्‍हणाला, ''अखिलेशची ही पहिली इंटरनॅशनल ट्रीप आहे आणि तो जितका या प्रवासाकरिता उत्‍साहित आहे, तितकाच मी देखील आहे. शोने लोकप्रियतेचा कळस गाठला आहे. तसेच यामध्‍ये एक नवीन वळण येणार आहे. वॅसेक्‍टोमी रिव्‍हर्सल शस्‍त्रक्रियेमुळे अखिलेशच्या आयुष्यात अनेक गोष्टी सहजसोप्‍या होणार असल्या तरी त्‍यामुळे त्‍याच्‍या आयुष्‍यात नवीन वळणे देखील येणार आहेत. या मालिकेचे सर्व कलाकार आणि क्रू सदस्‍य या ट्रीपकरिता खूपच उत्‍सुक आहेत. तेथे कामातून वेळ काढणे थोडे कठीण असेल, पण आम्‍ही त्‍यातूनच वेळ काढत थोडी मजा देखील करणार आहोत.''

करण प्रमाणेच या ट्रीपविषयी अत्‍यंत उत्‍सुक असलेली इरा म्‍हणजेच जिया शंकर म्‍हणाली, ''ही खरेतर माझी परदेशातील पहिली ट्रीप आहे आणि मलेशियाला भेट देण्‍यासाठी मी खूपच उत्‍सुक आहे. जरी आमचे व्‍यस्‍त वेळापत्रक असले तरीही, मला शक्‍य होईल तसे हरप्रकारे मी माझ्या कामातूनच मजा मिळवण्‍याचा प्रयत्‍न करणार आहे. मला मलेशियन खाद्यपदार्थ खायचे आहेत आणि करण सोबत तेथील स्‍थळांना भेट द्यायची आहे. आमच्‍या क्रिएटिव्‍ह टीमने आकर्षक ट्रॅकची रचना केली आहे, ज्‍यामध्‍ये अखिलेश-इराच्‍या आयुष्‍यात एक महत्‍त्‍वाचे वळण आलेले दाखवण्‍यात येणार आहे. हे पाहणे अत्‍यंत मनोरंजक असणार आहे.'' 

अखिलेशच्‍या वॅसेक्‍टोमी रिव्‍हर्सल शस्‍त्रक्रियेमुळे इरा आणि अखिलेश सध्या अनुभवत असलेली हानीकारक वेळ संपेल का की या शस्‍त्रकियेमुळे दोघांसाठी एक नवीन जाळे विणले जाणार आहे.या सर्व घडामोडी मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.