मेघा-सिद्धार्थ अडकले विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 17:05 IST
काव्यांजली, कुमकुम यांसारख्या मालिकेत झळकलेली अभिनेत्री मेघा गुप्ता नुकतीच लग्नबंधनात अडकली. गायक सिद्धार्थ कर्णिक याच्यासोबत तिने विवाह केला. मेघा ...
मेघा-सिद्धार्थ अडकले विवाहबंधनात
काव्यांजली, कुमकुम यांसारख्या मालिकेत झळकलेली अभिनेत्री मेघा गुप्ता नुकतीच लग्नबंधनात अडकली. गायक सिद्धार्थ कर्णिक याच्यासोबत तिने विवाह केला. मेघा आणि सिद्धार्थ गेल्या कित्येक महिन्यांपासून नात्यात आहेत. त्यांनी मे महिन्यात साखरपुडा केला आणि सप्टेंबरमध्ये ते लग्न करणार होते. पण गेल्या महिन्यात मेघाच्या वडिलांचे अचानक निधन झाले. त्यामुळे त्या दोघांनी धुमधडाक्यात लग्न न करता अतिशय साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी नुकतेच कोर्टात लग्न केले.