Join us  

मेघा आणि सईच्या मैत्रीमध्ये पडणार का फूट ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 6:55 AM

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार कॅप्टनसीचा टास्क. प्रत्येक सदस्याला घरातील सदस्यच देणार एक टास्क जो त्यांनी ...

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार कॅप्टनसीचा टास्क. प्रत्येक सदस्याला घरातील सदस्यच देणार एक टास्क जो त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करायचा आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये घरामधील सदस्यांना टास्क देण्यात येतात जे त्यांनी पूर्ण करायचे असतात त्याचप्रकारे हा देखील टास्क घरातील रहिवाश्यांना पूर्ण करायचा आहे. कॅप्टनसीसाठी प्रत्येक सदस्य खूप मेहनत घेऊन बिग बॉसने दिलेले कार्य पूर्ण करतात. कधी यावरून घरामध्ये भांडण झाल्याचे देखील प्रेक्षकांनी बघितले आहे. याच कॅप्टनसीच्या टास्क वरून होणार मेघा आणि सई मध्ये वाद. त्या वादाचे कारण काय आहे ? मेघा सईला काय सांगण्याचा प्रयत्न करते आहे ? सईचं म्हणने आहे कि, मेघा कॅप्टनसीला घेऊन खूपच obsessed आहे हे बरोबर आहे का ? मेघाचे यावर काय म्हणणे आहे ? सईच्या अशा वागण्यामुळे मेघाला प्रश्न पडणार आहे कि, सई मैत्रीण आहे कि दुश्मन जे मेघा ऋतुजाला बोलून देखील दाखवणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठीचा आजचा भाग रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे कॅप्टनसीचा टास्क. कच्ची अंडी, ग्रास कटर – कारले, शेण आणि केक या गोष्टी टास्कसाठी सदस्यांना देण्यात येणार आहे. घरचेच सदस्यांना वेगळी वेगळी आव्हानं देणार आहेत. जसे भूषण कडूला १२ कच्ची अंडी खाणे, अनिल थत्ते यांनी साडे तीन पोळ्या पाणी न पिता खाणे, सईने शेणाचे ८५ गोळे बनवणे, मेघाने कच्ची अंडी भांड्यामध्ये फोडणे तसेच ऋतुजाने कारल्यांचे ५ तुकडे करणे यादरम्यान तिचे हात बांधलेले असणार आहेत. सदस्य हा टास्क कसा पूर्ण करतील ? त्यांना कोणत्या अडचणी येतील ? हे बघायला मज्जांयेणार आहे. तेंव्हा कॅप्टनसीसाठी आज सदस्यांमध्ये रंगणारी ही चुरस बघणे रंजक असणार आहे.