Join us

MC Stan : 'त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला…', एमसी स्टॅनचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 19:39 IST

MC Stan : बिग बॉस १६चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन (MC Stan) हा खूपच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याला मिळणाऱ्या प्रसिद्धीने तर त्याने सर्वच विक्रम मोडले आहेत.

बिग बॉस १६(Bigg Boss 16)चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन (MC Stan) हा खूपच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याला मिळणाऱ्या प्रसिद्धीने तर त्याने सर्वच विक्रम मोडले आहेत. बिग बॉसच्या विजयानंतर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्याने एका मुलाखतीत बिग बॉसचा प्रवास आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील खुलासे केले आहेत. यावेळी त्याने त्याच्या आयुष्यातील धक्कादायक खुलासा केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

एमसी स्टॅनने सांगितले की,एकदा आम्ही आमच्या मित्राचा वाढदिवस साजरा करत होतो आणि अचानक काही लोक तिथे आले आणि त्याला मारण्यास सुरुवात केली. काहींनी त्याच्या मानेवर तलवारीने वार केले तर काहींनी त्याच्या डोक्यात वार केले. हे सर्व काही आमच्या समोरच घडत होते. अशा गोष्टी माझ्या बाबतीत देखील दोन ते तीन वेळा झाल्या आहेत.

तो पुढे म्हणाला की, पी-टाऊनमधील काही लोकांनी मला मारण्याची धमकी दिली आणि तशी त्यांची इच्छा देखील होती त्यांनी तसाप्रयत्न देखील केला होता पण देवाच्या कृपेने मी दरवेळी यातून सुखरूप वाचलो. एमसी स्टॅनच्या या विधानानंतर त्याची ही मुलाखत सध्या खूपच चर्चेत आली आहे. त्याच्या या वायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत.

टॅग्स :बिग बॉस