Join us  

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील हा अभिनेता आहे अनिता दातेचा बेस्ट फ्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 7:43 PM

अनिता आणि रात्रीस खेळ चाले या मालिकेतील एक अभिनेता अनेक वर्षांपासून बेस्ट फ्रेंड आहेत.

ठळक मुद्देअनिता आणि रात्रीस खेळ चाले या मालिकेत दत्ताची भूमिका साकारणारा सुहास शिरसाट हे अनेक वर्षांपासून बेस्ट फ्रेंड आहेत.

अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. गेल्या कित्येक आठवड्यापासून टीआरपीच्या रेसमध्ये हीच मालिका अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील अनिताचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडतो. या मालिकेतील ही राधिका प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक वाटू लागली आहे. त्यामुळे तिची सुख दुःख ते आपलीच सुख दुःख असल्यासारखे मानतात. या मालिकेमुळे अनिताला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. 

अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर तिने हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत काम केले. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.

अनिता आणि रात्रीस खेळ चाले या मालिकेत दत्ताची भूमिका साकारणारा सुहास शिरसाट हे अनेक वर्षांपासून बेस्ट फ्रेंड आहेत. त्या दोघांनी काही महिन्यांपूर्वी झी मराठीवरील कानाला खडा या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से या कार्यक्रमात सांगितले होते. अनिता प्रमाणेच सुहास देखील आता छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेता बनला असून रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये देखील तो झळकला होता. याच कार्यक्रमामुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. 

अनिता ही मुळची नाशिकची असून तिचे बालपण, शिक्षण नाशिकमध्ये झाले आहे. तिचे काका उपेंद्र दाते हे नाट्यक्षेत्रात  प्रसिद्ध आहेत. नाशिकच्या कन्या विद्यालयात तिचे शिक्षण झालेले आहे. त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेली. पुण्याच्या ललित कला केंद्रातून तिने पदवी घेतली. अनिताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने ती शाळेत आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये काम करत असे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील भूमिकेमुळे तिच्या संपूर्ण करियरला कलाटणी मिळाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. 

टॅग्स :अनिता दातेरात्रीस खेळ चालेमाझ्या नवऱ्याची बायको