Join us

मयूरी लागली लग्नाच्या तयारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 17:12 IST

'अस्मिता' या मालिकेत खाजगी गुप्तहेराची भूमिका साकारणारी मयुरी वाघ आणि त्याच मालिकेत तिच्या पतीची म्हणजेच अभिची भूमिका साकरणारा पियुष ...

'अस्मिता' या मालिकेत खाजगी गुप्तहेराची भूमिका साकारणारी मयुरी वाघ आणि त्याच मालिकेत तिच्या पतीची म्हणजेच अभिची भूमिका साकरणारा पियुष रानडे या दोघांचाही काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. आता, मयुरी आणि पियुष हे दोघे जानेवारीमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचे समजत आहे. कारण मयूरी ही लग्नाच्या तयारीसाठी लागली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण तिने लग्नाच्या शॉपिंगचे काही फोटो सोशलमीडियावर अपलोड केले आहेत. तिच्या या फोटोला चाहत्यांनी भरभरून पसंती दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच चाहत्यांनी तिच्या या फोटोवर प्रचंड कमेंन्टदेखील केल्या आहेत. अस्मिता-अभिची मालिकेतील ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची आणि ख-या आयुष्यातही त्यांची जोडी असावी असेही अनेकांना वाटायचं. मयुरी-पियुषच्या चाहत्यांची ही इच्छा आता खरी झाली असून त्या दोघांनी आता आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. मालिका वा चित्रपटात एकमेकांसोबत काम करता करता कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. अमिताभ-जया, धर्मेंद्र- हेमामालिनी, दीपिका-रणवीपर्यंत अनेकजण आपल्या सहकलाकाराच्या प्रेमात पडले आणि कायम एकत्र राहिले. मराठी चित्रपटसृष्टीतही उमेश कामत-प्रिया बापट, सौरभ गोखले- अनुजा साठे, आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकर आता या जोडीमध्ये मयूरी वाघ - पियुष रानडे हे नावदेखील सामील झाले आहे. रील लाईफमधील जोडीदार आता रिअल लाईफमध्येही जोडीदार बनले आहेत. 'अस्मिता' मालिकेत काम करता करता मयूरी आणि पियुषची ओळख झाली. गेल्या दोन वर्षांपासून एकत्र काम करत असल्यामुळे आधि या दोघांची मैत्री झाली. या मैत्रिचे रूपांतर प्रेमात झाले आहे. पियुष रानडे हा नुकताच लाल इश्क या चित्रपटादेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाला.