Join us  

संजनाच्या मराठमोळ्या साजशृंगारावर चाहते फिदा; video पाहून तुम्ही म्हणाल, क्या बात!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 2:49 PM

Rupali bhosale: रुपाली चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियाचा आधार घेते. यामध्येच तिने अलिकडे एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले (rupali bhosale). या मालिकेत रुपालीने संजना ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे नकारात्मक भूमिका साकारुनही रुपालीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. रुपाली चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियाचा आधार घेते. यामध्येच तिने अलिकडे एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

रुपाली कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अनेकदा ती सेटवरचे वा तिच्या वैयक्तिक जीवनातील काही फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने पारंपरिक मराठमोळ्या साजशृंगारात एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, रुपालीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने रॉयल ब्ल्यू रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तसंच या व्हिडीओच्या बँकग्राऊंडला साज ह्यो तुझा हे गाणं सुरु असल्याचं ऐकू येत आहे.  रुपाली अनेकदा तिच्या फोटोशूटमधील काही फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने केलेलं हे फोटोशूट चांगलंच चर्चिलं जात आहे. 

टॅग्स :रुपाली भोसलेटिव्ही कलाकारटेलिव्हिजन