Join us  

ये सफरनामा! अभिज्ञा भावेची काश्मीर भटकंती, पतीसोबत बर्फाळ प्रदेशात रमली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 2:52 PM

अभिनेत्री अभिज्ञा भावे हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय नाव आहे.

Abhidnya Bhave : अभिनेत्री अभिज्ञा भावे हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय नाव आहे. मराठीसह हिंदी मालिकांमध्ये काम करत अभिनेत्रीनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. तिच्या उत्तम अभिनयासह मनमोकळ्या स्वभावामुळे अभिज्ञाने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

अभिज्ञा कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय असून कायम तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील अपडेट चाहत्यांना देत असते. सध्या अभिज्ञा पती मेहुल पै सोबत काश्मिरच्या भटकंतीत रमली आहे. अलिकडेच तिने काश्मीर सफर करतानाचे काही फोटोज चाहत्यांसोबत शेअर केलेत. काश्मीरमधील सोनमर्गमध्ये बर्फात खेळतानाचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याचे पाहायला मिळतायत.

Sunshine and smiles, all natural!!! असं कॅप्शन या फोटोंना देत अभिनेत्रीनं नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे. अभिज्ञाच्या या पोस्टवर अभिनेत्री सुकन्या मोनेंसह मयुरी देशमुखने देखील कमेंट्स केल्या आहेत. 

अभिज्ञा  बर्फाळ प्रदेशात आपल्या पतीसोबत सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटताना दिसतेय. या भटंकती दरम्यान या जोडप्याने बनवलेली इंस्टाग्राम रिल देखील चर्चेचा विषय बनलीय. त्यांच्या या व्हायरल रिलवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. 

टॅग्स :अभिज्ञा भावेटेलिव्हिजनसेलिब्रिटी