Join us

मराठी सेलेब्रिटींनी घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 22:17 IST

 एखादा चित्रपट जेव्हा बॉक्स आॅफिसवर हिट होतो, तेव्हा त्याच्या मागे फक्त अभिनेता- अभिनेत्री, डायरेक्टर, प्रोड्युसरच कारणीभूत नसतात, तर कॅमेरामॅन, ...

 एखादा चित्रपट जेव्हा बॉक्स आॅफिसवर हिट होतो, तेव्हा त्याच्या मागे फक्त अभिनेता- अभिनेत्री, डायरेक्टर, प्रोड्युसरच कारणीभूत नसतात, तर कॅमेरामॅन, मेकपआर्टिस्ट, स्पॉटबॉय, साऊंड टिम, वेशभूषाकार, आर्ट डिरेक्टर यांसारखे अनेक लोक एकत्रीत येऊन  चित्रपट बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. परंतू त्यांची दखल  बहुधा कोणीच घेताना दिसत नाही. परंतू आपले मराठी कलाकार वेगळ््याच मातीचे बनले आहेत हे नक्की. आता पाहा ना... सरकार,क्वीन व दुनियादारीचे या चित्रपटाचे पोस्टर डिझाईन केलेल्या सचिन गुरव याला सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडीत, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी अशा महेश कोठारे,सई ताम्हणकर,सोनाली कुलकर्णी,सोनाली खरे, हेमंत डोमे,क्रांती रेडकर अशा अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीने सोशलमिडीयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनची मराठीचित्रपटसृष्टींने घेतलेली ही दखल खरच कौतुकास्पद आहे.