Join us  

मराठमोळी अभिनेत्री स्वरदा ठिगळे नव्या लूकमध्ये दिसतेय खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 7:00 AM

स्वरा ठिगळे हिने तिचा नवा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

सोज्वळ सौंदर्य, भावदर्शी चेहरा यामुळं अभिनेत्री स्वरदा ठिगळेला रसिकांची पसंती मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. सोशल मीडियावर ती फोटोही आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. नुकताच तिने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.स्वरा ठिगळे हिने तिचा नवा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिचा हा लूक अमित यशवंत या हेअर स्टायलिस्टने केला आहे. या लूकमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोला खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत.

 स्वरदा मुळची पुण्याची असून तिचा जन्म २९ ऑक्टोबर, १९९३ साली झाला आहे. स्वरदाने तिच्या करियरची सुरूवात मराठी सिनेइंडस्ट्रीतून केली आहे. २०१३ साली तिने माझे मन तुझे झाले या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे.

या मालिकेत तिने शुभ्राची भूमिका केली होती. ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तसेच २०१७ साली तिने सावित्री देवी कॉलेज या हिंदी मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिने सांची मिश्राची भूमिका केली होती. ती स्टार भारत वाहिनीवरील ‘प्यार के पापड’ मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने शिविकाची भूमिका साकारली होती.

टॅग्स :टिव्ही कलाकार