Join us  

मराठमोळ्या अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, व्हिडीओ शेअर करत दिली खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 11:56 AM

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पूजा सावंतनेही गुपचूप एंगेजमेंट केली. दरम्यान आता आणखी एका अभिनेत्रीनं गुपचूप साखरपुडा केला आहे. तिने साखरपुड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत ही खुशखबर चाहत्यांना दिली आहे.

मराठी कलाविश्वात मागील वर्षांपासून नवीन वर्षातही लग्नसराई पाहायला मिळत आहे. नुकतेच आता गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, अभिनेता ऋषी मनोहर-तन्मई पेंडसे यांनी लग्नगाठ बांधली. तसेच अभिनेत्री पूजा सावंतनेही गुपचूप एंगेजमेंट केली. दरम्यान आता आणखी एका अभिनेत्रीनं गुपचूप साखरपुडा केला आहे. तिने साखरपुड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत ही खुशखबर चाहत्यांना दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे स्वरदा ठिगळे (Swarada Thigale).

स्वरदा ठिगळे हिने इंस्टाग्रामवर एंगेजमेंटचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. तिने सिद्धार्थ राऊतसोबत साखरपुडा केला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, एकदा तुम्ही योग्य व्यक्तीला भेटलात की, तुम्हाला फक्त माहीत असते. मी नाही कसे म्हणू शकते??? सर्व कुटुंबीय आणि मित्रांनी त्यांच्या उपस्थितीने आमचा सोहळा साजरा केला. प्रत्येकाने आम्हाला शुभेच्छा आणि प्रेम दिले त्यासाठी धन्यवाद. तुझ्यासोबत कायम राहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही सिद्धार्थ राऊत. तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. 

कोण आहे तिचा होणारा नवरा?सिद्धार्थ राऊतबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. मात्र त्याच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार, तो डिझायनर आहे. 

स्वरदाच्या वर्कफ्रंटबद्दल..स्वरदा मुळची पुण्याची असून तिचा जन्म २९ ऑक्टोबर, १९९३ साली झाला आहे. स्वरदाने तिच्या करियरची सुरूवात मराठी सिनेइंडस्ट्रीतून केली आहे. २०१३ साली तिने माझे मन तुझे झाले या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेत तिने शुभ्राची भूमिका केली होती. ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तसेच २०१७ साली तिने सावित्री देवी कॉलेज या हिंदी मालिकेत काम केले होते. याशिवाय ती स्टार भारत वाहिनीवरील ‘प्यार के पापड’ मालिकेत झळकली होती. शेवटची ती ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती. 

स्वरदा देतेय योग धडेस्वरदा बऱ्याच दिवसांपासून ती कलाविश्वातून गायब असून सध्या योगचे धडे देताना दिसत आहे.