Join us  

'चंद्र आहे साक्षीला'मध्ये सुबोध भावेच्या चुलत बहिणीची भूमिका साकारतेय ही अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2020 8:30 AM

सुबोध भावे अभिनीत 'चंद्र आहे साक्षीला' मालिकेतील मिताली आचरेकर या भूमिकेची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

कलर्स मराठी वाहिनीवर नुकतीच 'चंद्र आहे साक्षीला' ही मालिका नुकतीच दाखल झाली. या मालिकेला प्रेक्षकांचा पहिल्यापासून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेत श्रीधरच्या भूमिकेत अभिनेता सुबोध भावे आणि स्वातीच्या भूमिकेत अभिनेत्री ऋतूजा बागवे पहायला मिळत आहेत. या मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून एक रहस्य दडलेले पहायला मिळत आहे. 

चंद्र आहे साक्षीला मालिकेचा नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात नवीन ट्विस्ट पहायला मिळाला. तो म्हणजे श्रीधरची चुलत बहिण मिताली आचरेकरने स्वातीच्या घरी जाऊन त्याच्या विरोधात तिचे कान भरल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर श्रीधरनेच तिला हे करायला सांगितल्याचे पहायला मिळाले. आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तर दुसरीकडे मिताली आचरेकरची देखील सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. 

मिताली आचरेकरची भूमिका अभिनेत्री वैशाली राहुल भोसले साकारते आहे. वैशालीने मालिका व नाटक या माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. वैशालीची मराठी सिनेइंडस्ट्रीतील करियरची सुरूवात छोट्या पडद्यापासून झाली. ई टीव्हीवरील ब्रह्मांडनायक या गजानन महाराजांवर आधारित मालिकेत तिने काम केले आहे. याशिवाय तिने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. स्टार प्रवाहवरील लक्ष्य, बंध रेशमाचे मालिकेत कैरेक्टर रोल केले. झी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टारमध्ये ती झळकली होती.

तसेच कलर्स मराठी वरील तू माझा सांगाती मालिकेत तिने भानुबाई आणि द्वारकाची भूमिका केली. तिने या मालिकेत साकारलेले दोन्ही पात्र निगेटिव्ह होते. पण, या मालिकेतील भानूबाईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतील भानुबाई या भूमिकेने तिला घराघरात ओळख मिळाली. 

मिलिंद शिंदे लिखित दिग्दर्शित नाच तुझंच लगिन हाय या सिनेमात काम केले. तसेच आगामी रमेश मोरे लिखित आणि दिग्दर्शित टॉपर या सिनेमातही ती झळकणार आहे.

याशिवाय वैशालीने हृषिकेश कोळी लिखित-दिग्दर्शित वर खाली दोन पाय या प्रायोगिक नाटकाची निर्मिती करत निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. कथ्थकमध्ये डिप्लोमा करत असलेली वैशाली लवकरच क्लासिकल नृत्यावर आधारित एका नाटकात काम करताना दिसणार आहे.

टॅग्स :सुबोध भावे कलर्स मराठी